पुणे, ऑगस्ट २०२५ : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘फिजिक्सवाला’च्या *इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (IOI)*ने पुण्यात आपला नवा बहुविद्याशाखीय कॅम्पस सुरू केला आहे. तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा या तीन क्षेत्रांतील करिअर-केंद्रित शाळा या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हडपसर येथील क्रोम मॉलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या कॅम्पसचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना उद्योगसमोरील आव्हानांशी सुसंगत कौशल्ये विकसित करून देणे आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी मार्गदर्शक व प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आयओआय ही मेधावी स्किल्स युनिव्हर्सिटीची इंडस्ट्री स्किलिंग पार्टनर असून येथे ४ वर्षांचा बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स) आणि ३ वर्षांचा बीबीए यासारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय हेल्थकेअर शाळेत रेडिओलॉजी, ऑपरेशन थिएटर, मेडिकल लॅब व डायलिसिस टेक्नॉलॉजी यामध्ये बी.व्होक पदवी अभ्यासक्रम देखील राबवले जात आहेत.
याप्रसंगी फिजिक्सवाला कंपनीचे सीओओ गोपाल शर्मा यांनी सांगितले, “पुणे अनेक टॅलेंट असलेले शैक्षणिक केंद्र आहे. पुण्यामध्ये आमच्या नवीन आयओआय कॅम्पससह आम्ही प्रयत्न करत आहोत की, विद्यार्थ्यांना करिअर-केंद्रित उच्च शिक्षणासाठी त्यांच्या मूळगावामधून स्थलांतरित करण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञान, व्यवसाय किंवा आरोग्यसेवा असो आम्ही दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
आयओआय पुणे हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कॅम्पसच्या नेटवर्कमध्ये नवीन भर आहे, जे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या पद्धतींना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा आणि त्यांना उज्ज्वल करिअर घडवण्यास मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
आयओआय पुणे येथील सर्व प्रोग्राम्ससाठी प्रवेश प्रक्रिया आता सुरू आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेशाद्वारे किंवा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेण्यासाठी पीडब्ल्यू कॉमन एन्ट्रन्स एक्झाम (सीईई) देऊन या प्रोग्राम्ससाठी अर्ज करू शकतात. आयओआय अर्जदारांना गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती देखील देत आहे, ज्यामध्ये महिला अर्जदार, संरक्षण कर्मचाऱ्यांचे पाल्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती समाविष्ट आहे.