Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
Navale Bridge Accident : नऱ्हे येथील नवले पूल चौकात शुक्रवारी (ता. १३ मार्च) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कात्रजकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरील दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्याने सहा वाहनांचा साखळी अपघात घडला. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने समोर असलेल्या वाहनांवर धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की काही वाहने गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली.
अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
For Feedback - puneprahar2018@gmail.com
September 16, 2026
September 16, 2026
September 16, 2026
September 15, 2026
September 13, 2026
September 12, 2026