पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती: राजाराम पुलावरील वाहतूक बदल; इनामदार चौकातील ‘राईट टर्न’ तात्पुरता बंद

(प्रतिनिधी मानस मते) पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीसंदर्भात पुणेकरांना महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. राजाराम पुल ते फन टाईम थिएटरदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी इनामदार चौकातील उजवीकडील वळण (Right Turn) बंद करण्यात आला आहे. हे बदल वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरते स्वरूपात लागू करण्यात आले आहेत.

🚦 अपघात टाळण्यासाठी निर्णय

या ठिकाणी उतरताना वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे उजवीकडे वळणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढते, त्यामुळे वाहतूक विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

🔁 पर्यायी मार्ग

वाहनचालकांनी राजाराम पुल चौकात यु-टर्न घेऊन पुढील मार्गक्रमण करावे, असे वाहतूक विभागाने सूचित केले आहे.

🗓️ सूचना व हरकतीसाठी कालावधी

नागरिकांना या निर्णयावर ४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत आपले सूचना किंवा हरकती लेखी स्वरूपात सादर करता येतील.
पत्ता: पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा, पुणे.

नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहने या आदेशातून वगळण्यात आली आहेत.

पुणेकरांनी नवीन मार्गयोजनेनुसार वाहन चालवावे व वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.