स्मार्टफोन वापरताय? मग ब्लूटूथ, लोकेशन आणि Wi-Fi सतत ऑन ठेवण्यापूर्वी ही खबरदारी घ्या!

मुंबई | (प्रतिनिधी मानस मते): आजकालचा स्मार्टफोन हा केवळ संवादाचे माध्यम न राहता, आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग बनला आहे. त्यामुळे अनेकजण ब्लूटूथ, लोकेशन आणि Wi-Fi ही फीचर्स सतत ऑन ठेवतात. मात्र, ही सवय तुमच्य डेटा सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ब्लूटूथ सतत चालू असल्यास अनोळखी डिव्हाइसशी अनवधानाने कनेक्ट होण्याचा धोका असतो. यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा हॅक होऊ शकतो. त्याचप्रमाणे, लोकेशन चालू असल्यास अनेक अ‍ॅप्स तुमची हालचाल ट्रॅक करतात, त्यामुळे प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होतो.

Wi-Fi सतत ऑन ठेवल्यास, विशेषतः ओपन किंवा असुरक्षित नेटवर्क वापरल्यास, तुमच्या मोबाईलमध्ये मॅलवेअर शिरू शकतो आणि तो तुमच्या डेटाला हानी पोहोचवू शकतो.

🔐 सुरक्षित स्मार्टफोन वापरासाठी उपाय :

  • ब्लूटूथ, लोकेशन आणि Wi-Fi फक्त गरज असेल तेव्हाच चालू ठेवा
  • मोबाईलचे सिक्युरिटी अपडेट्स वेळोवेळी घेत राहा
  • विश्वसनीय नेटवर्क व अ‍ॅप्सचाच वापर करा

थोडक्यात, स्मार्टफोनचा वापर जितका स्मार्ट, तितकीच सुरक्षितता अधिक महत्त्वाची!