पुणे | महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे विभाग – मराठवाडा आणि खानदेश यांना थेट जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. हा मार्ग जालना आणि जळगाव जिल्ह्यांना थेट जोडणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सध्या जळगाव ते जालना रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास मनमाड मार्गे 336 किमीचा मोठा फेरा मारावा लागतो. पण प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर हे अंतर फक्त 174 किलोमीटर राहणार आहे, म्हणजे जवळपास 162 किमीने प्रवास कमी होणार आहे.
प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये
एकूण लांबी : 174 किमी
अंदाजित खर्च : ₹7,105 कोटी 43 लाख
केंद्र सरकारची मंजुरी : ऑगस्ट 2024
जमिनीचे सर्वेक्षण : ड्रोनच्या साहाय्याने पूर्ण
कुठल्या गावांमध्ये रेल्वे स्थानके होणार?
या नव्या रेल्वे मार्गात खालील गावांमध्ये स्थानके प्रस्तावित आहेत : नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिनागाव.
सध्याची कामगिरी कुठपर्यंत?
बदनापूर तालुक्यातील तीन गावांमध्ये जमिनीची मोजणी पूर्ण
चौथ्या गावात मोजणी सुरू
भोकरदन तालुक्याची मोजणी सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार
जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू होणार
सुविधेचा फायदा : हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ, खर्च आणि श्रम तिन्ही बाबतीत मोठा बचाव होणार आहे. मराठवाडा आणि खानदेशमधील व्यापार, पर्यटन आणि सामाजिक संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
मोठी बातमी ! ८ आणि ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी, महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘ही’ आहेत कारणं
भारतीय रेल्वेच्या या नवीन उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत जोडणी आणखी सक्षम होणार असून, ग्रामीण भागातील अनेक गावांना थेट रेल्वे स्थानकाची सुविधा मिळणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा टप्पा ठरणार आहे.