‘नेक्सस वेस्टएंड’ मॉलतर्फे ‘शिपरेक वंडर्स’चे अनावरण

By: Editor_Manas

On: Monday, May 18, 2026 12:15 PM

Google News
Follow Us

पुणे, १८  मे २०२६: या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ‘नेक्सस वेस्टएंड मॉल’ मध्ये  नऊ मेपासून सुरू झालेल्या ‘शिपरेक वंडर्स’ (Shipwreck Wonders) या अथांग आणि भव्य अनुभवाच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना गुप्त खजिने, चाच्यांच्या दंतकथा आणि सागरी सफरीच्या दुनियेत सफर करण्याची संधी मिळणार आहे.

किनार्‍याला लागलेल्या एका गूढ चाच्यांच्या जहाजाचे अवशेष (शिपरेक), जुने झालेले जहाजाचे डेक, चमकणारे खजिन्यांचे बॉक्स, लाकडी डॉक्स, अँकर्स (नांगर), बॅरल्स आणि नाट्यमय सागरी देखावे हे सर्व काही मनमोहक प्रकाशयोजना आणि बारकाव्यांसह जिवंत करण्यात आले आहे. यामुळे येथील प्रत्येक कोपरा एखाद्या चाच्यांच्या गोष्टीसारखा भासतो!

हा संपूर्ण ‘वॉक-थ्रू’ अनुभव असून, यामध्ये सर्व वयोगटांसाठी चाच्यांच्या थीमवर आधारित विविध आकर्षक झोन्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये येणारे पर्यटक ‘पोज लाइक अ पायरेट’ (चाच्यांसारखी पोज द्या), कॅनोनिअर्स ब्लास्ट, कॅप्टन्स हूक रिंग्ज, थरारक पायरेट राइड सिम्युलेशन, बॉल पूल स्लाइड आणि इमर्सिव्ह प्रोजेक्शन रूम : ओशन एक्सपीरियन्स यांसारख्या अनेक मजेदार गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 18, 2026

May 18, 2026

May 18, 2026

May 18, 2026

May 17, 2026

May 17, 2026