“घरी सोडतो” म्हणत कारमध्ये बसवलं; पुण्यात महिला वकिलावर अत्याचार

By: Editor_Manas

On: Monday, May 18, 2026 11:08 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : पुण्यात अत्यंत संतापजनक घटना समोर आली असून, धावत्या कारमध्ये एका महिला वकिलावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंढवा-कोरेगाव पार्क रोड परिसरात मध्यरात्री ही घटना घडली असून, यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका हॉटेलमध्ये आयोजित पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी आरोपीची तिच्याशी ओळख झाली. दोघांची यापूर्वी कोणतीही ओळख नव्हती. पार्टी संपल्यानंतर आरोपीने महिलेला “मी तुला घरी सोडतो” असे सांगत विश्वास संपादन केला.

महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत कारमध्ये प्रवास सुरू केला. मात्र, अर्ध्या रस्त्यात आरोपीने धावत्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिला पेशाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मध्यरात्री महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहर किती सुरक्षित आहे, याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 18, 2026

May 18, 2026

May 18, 2026

May 17, 2026

May 17, 2026

May 17, 2026