सोलापूरहून धर्मावरमसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन! २६ स्थानकांवर घेणार थांबा, तिरुपती भक्तांसाठी दिलासादायक सेवा

सोलापूर | (प्रतिनिधी मानस मते): पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने सोलापूरहून धर्मावरमपर्यंत नवीन साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा २५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

मुळात ही गाडी सोलापूर ते तिरुपती दरम्यान धावणार होती. मात्र, प्रवाशांकडून ती थेट धर्मावरमपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली होती. रेल्वेने ही मागणी मान्य करत आता ही गाडी धर्मावरमपर्यंत धावणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

🕐 वेळापत्रक कसे राहणार?

  • सोलापूर ते धर्मावरम गाडी: दर गुरुवारी रात्री ११.२० वाजता सोलापूरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ३.३० वाजता धर्मावरम स्थानकावर पोहोचेल.

  • धर्मावरम ते सोलापूर गाडी: दर शनिवारी सकाळी ५.३० वाजता धर्मावरमहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचेल.

🚆 किती फेऱ्या होणार?

या साप्ताहिक विशेष गाडीच्या:

  • सोलापूर-धर्मावरम दरम्यान १० फेऱ्या

  • धर्मावरम-सोलापूर दरम्यान १० फेऱ्या
    म्हणजेच एकूण २० फेऱ्या होणार आहेत.

🛤️ कोणकोणत्या स्टेशनवर थांबा?

रेल्वे प्रशासनानुसार ही गाडी २६ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. त्यात पुढील स्थानकांचा समावेश आहे:

कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, बीदर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, ताडिपत्री, यरगुंटला, कडप्पा, राजमपेटा, रेणीगुंटा, तिरुपती, पाकाला, पीलेर, मदनपल्ली रोड, मुलकला चेरुव, कदीरी.

ही गाडी सुरू झाल्यामुळे सोलापूर, धाराशिव, लातूर व मराठवाड्यातील भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायक होणार आहे. तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना ही सेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.