Special Trains : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी : पुण्याहून कोकणसाठी धावणार १२ स्पेशल ट्रेन्स, असे आहे नियोजन

By: Editor_Pratik

On: Thursday, July 24, 2025 1:14 PM

Special Trains
Google News
Follow Us

Special Trains : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी : पुण्याहून कोकणसाठी धावणार १२ स्पेशल ट्रेन्स, असे आहे नियोजन

पुणे : कोकणात गणेशोत्सवासाठी पुण्यातून जाणाऱ्यांसाठी पुणे रेल्वे विभागाकडून १२ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू होणार आहे.

कोकणात गणोशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यासाठी कोकणवासी आपली गावी जातात. पुण्यात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने कोकणातील अनेक नागरिक राहतात. त्यामुळे रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०१४४७ शनिवारी २३, ३० ऑगस्ट व सहा सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री १२ वाजून २५ वाजता सुटेल.

ती रत्नागिरी येथे सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८८ साप्ताहिक विशेष रेल्वे शनिवार २३, ३० ऑगस्ट आणि सहा सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.

पुणे-रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४५ मंगळवार २६ ऑगस्ट आणि दोन व नऊ सप्टेंबर रोजी पुण्यातून रात्री १२ वाजून २५ वाजता सुटेल. ती रत्नागिरी येथे सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४६ मंगळवार २६ ऑगस्ट आणि दोन व नऊ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी ५.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे पहाटे पाच वाजता पोहोचेल.

या दोन्ही गाड्यांना चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने मुंबई / पुणे-कोकणदरम्यान दहा मार्गावर दोनशे पन्नास गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. स

र्व विशेष फेऱ्यांचे आरक्षण आज, गुरुवार २४ जुलैपासून सुरू होणार आहे. गाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस मोबाइल अॅप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईहून सुटणाऱ्या विशेष गाड्या सीएसएमटी; तसेच एलटीटी येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगावसाठी सुटणार आहेत. पुण्याहूनही रत्नागिरीसाठी गाड्या सुटतील.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026