नवी दिल्ली (मानस मते) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राशी संबंधित दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे — छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि इटारसी ते नागपूर चौथ्या मार्गिकेचे बांधकाम.
या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार:
मंजुरी मिळालेले प्रकल्प:
- छत्रपती संभाजीनगर – परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण
- लांबी: 177 किमी
- खर्च: ₹2,179 कोटी
- जिल्हे: संभाजीनगर, जालना, परभणी
- लाभ: मुंबई-हैदराबाद दरम्यानचा पर्यायी मार्ग तयार होईल. मराठवाड्यातील दळणवळण अधिक वेगवान व सुरळीत होईल.
- इटारसी – नागपूर चौथी मार्गिका
- लांबी: 295 किमी
- खर्च: ₹5,451 कोटी
- जिल्हे: महाराष्ट्रातील नागपूर व मध्य प्रदेशातील नरमदापूरम, बेतूल, पंधुर्णा
- लाभ: दिल्ली-चेन्नई उच्च घनता मार्गावरील वाहतूक सुलभ होईल.
- अलुआबारी रोड – न्यू जलपायगुडी तिसरी व चौथी मार्गिका (पश्चिम बंगाल)
- डांगोआपोसी – जरोली तिसरी व चौथी मार्गिका (ओडिशा-झारखंड)
एकूण खर्च आणि फायदा:
- एकूण प्रकल्प खर्च: ₹11,169 कोटी
- विस्तार होणारे रेल्वे जाळे: 574 किमी
- राज्यांचा समावेश: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड
- लाभधारक जिल्हे: 13 जिल्ह्यांतील अंदाजे 43.60 लाख लोकसंख्या
- लाभ होणारी गावे: 2309 गावं
या प्रकल्पांमुळे केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर मालवाहतुकीसाठीही मोठा फायदा होणार आहे. दळणवळणाचा वेग वाढणार, रेल्वेची कार्यक्षमता वाढणार, इंधनावरील खर्चातही बचत होणार आहे. एकंदरीतच हे प्रकल्प भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालणारे ठरणार आहेत.