मुंबई : राज्यातील एसटी (Bus) महामंडळाच्या खराब बसमुळे सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडत आहेत. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची अवस्था दयनीय असल्याची ओरड सातत्याने प्रवाशांकडून होत असते. अनेकदा सोशल मीडियावर याचे फोटोही व्हायरल होत असतात. तर, अपघातानंतरचे व्हिडिओ देखील समोर येतात.
आता, गोंदिया (Gondia) आणि बेळगाव जिल्ह्यात एसटी बसच्या अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. गोंदियातून भंडाऱ्यात येत असलेल्या बसची ट्रॅक्टरला जबर धडक बसून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला आहे. तर, बेळगाव जिल्ह्यातील बेनचिनमर्डी येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 1 जण जागीच ठार झाला.
तर, दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून गंभीर जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराासाठी दाखल करण्यात आले आहे.
बेळगावमधध्ये एसटी बस अपघाताची भीषण घटना घडली. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बेळगाव जिल्ह्यातील बेनचिनमर्डी (ता. गोकाक) गावानजीक ही घटना घडली. अ
पघाताची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याबरोबरच मदतकार्य हाती घेतले. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातातील जखमीना बेळगाव आणि गोकाक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघात झाल्यावर बसमधील प्रवाशांना आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या लोकांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढले. त्यानंतर, गंभीर जखमींना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गोंदिया येथून प्रवाशांना घेऊन भंडाऱ्याकडं येत असलेल्या गोंदिया आगाराच्या एसटी बसची समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक बसली. या भीषण अपघातानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोसळल्यानं अपघातात ट्रॅक्टर चालकमालक असलेले लेकचंद उर्फ रोमन कापगते (50) यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.
हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावरील साकोलीच्या विर्शी फाट्यावर घडला. विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी याच विर्शी फाट्यावर एका विचित्र अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.