उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केला मेट्रोने प्रवास

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 4:51 PM

Google News
Follow Us

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यभर निवडणूक आचारसंहिता लागू झाली. याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पदाधिकाऱ्यांना मिळाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय वाहनांचा वापर थांबवून ती प्रशासनाकडे जमा करणे बंधनकारक असते.

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी तत्काळ आपले शासकीय वाहन प्रशासनाकडे जमा करत आचारसंहितेचे पालन केले. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका ते बोपोडी असा प्रवास मेट्रोने केला.

वाडेकर यांनी पुणे मनपा मेट्रो स्थानकातून प्रवास सुरू केला. शिवाजीनगर कोर्ट स्थानकावर मेट्रो बदलून त्यांनी पुढील प्रवास बोपोडी पर्यंत पूर्ण केला.

निवडणूक आचारसंहिता लागू होताच शासकीय सुविधांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणाऱ्या उपमहापौर वाडेकर यांच्या या कृतीची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 20, 2026

July 19, 2026