गोड प्रेमाचं हादरवणारं रुप; प्रेयसीच्या घरासमोर गेला अन्…प्रेयसीच्या ‘या’ कृत्यानंतर केलं भयानक कांड

By: Editor_Pratik

On: Sunday, June 15, 2025 3:43 PM

Google News
Follow Us

प्रेमात अपयश आलेले लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशातच आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने हे कृत्य का केलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय अजय कुशवाह नावाच्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतले. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रेयसी त्याच्यासोबत बोलत नव्हती, त्यामुळे अजय मानसिक तणावात होती. यात तणावात शनिवारी रात्री त्याने प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

अजयने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून अजयला रुग्णालयात नेले. यावेळी अजय 75 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या अजय जळत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कुशवाह हा फर्निचरचे काम करतो. तर त्याचे वडील भाजीपाला विकतात. अजयच्या वडिलांनी मुलीवर गंभीर आरोप केला आहे. अजयची प्रेयसी त्याला लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळत होती. कालांतराने मुलीकडून होणाऱ्या पैशाची मागणी खूप वाढली, जी अजय पूर्ण करू शकला नाही, म्हणून त्याने हे पाऊल उचलले.

अजय आणि त्याची प्रेयसी एकमेकांचे मित्र होते. काही काळानंतर दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. मात्र भांडणामुळे प्रेयसीने अजयशी बोलणे बंद केले. यामुळे अजय नैराश्यात होता. याच तणावातून त्याने हे मोठे पाऊस उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026

September 16, 2026

September 16, 2026