Rupali Chakankar | ८ दिवसांनी रूपाली चाकणकर वैष्णवी हगवणेच्या घरी; मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुनावले (VIDEO)

By: Editor_Pratik

On: Friday, May 23, 2025 10:54 AM

Google News
Follow Us

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल आठ दिवसांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हगवणे कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र त्यांच्या उशिरा झालेल्या भेटीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चाकणकर यांना कुटुंबीयांच्या घराबाहेरच अडवून, “अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा!” अशा शब्दांत फटकारण्यात आले.

हुक्का बारला पाठबळ देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई; ९० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबन; पोलीस दलाची प्रतिमा मलीन

कस्पटे परिवाराच्या दारातच चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रोखले. या वेळी धनंजय जाधव आणि अश्विनी खाडे यांनी स्पष्टपणे सांगितले, “मयुरी जगताप आणि अश्विनी कस्पटे यांसारख्या अनेक भगिनींना न्याय मिळवून देण्यात तुम्ही कमी पडला आहात, हे मान्य करा.” त्यांनी चाकणकर यांना प्रश्न विचारला की, “तुम्ही वेळेत पावले उचलली असती, तर आज ही वेळ आली नसती.”

Vaishnavi Hagawane Case : फरार असताना राजेंद्र हगवणेचा अलिशान गाड्यात प्रवास, हॉटेलात मुक्काम; पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह

कार्यकर्त्यांनी मागणी केली की, चाकणकर यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी आणि फक्त औपचारिकतेपुरता दौरा न करता, ठोस कारवाईसाठी पुढाकार घ्यावा.

Nilesh Chavan : स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ, निलेश चव्हाणचे कारनामे

या संतप्त भावना ऐकल्यानंतर चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले की, “आम्ही सुमोटो प्रकरण नोंदवले आहे, संबंधित एसपी कार्यालयाला सर्व कागदपत्र दिली आहेत. कारवाईसाठी निर्देशही दिले आहेत. आम्ही न्याय मिळवून देण्यासाठीच आहोत.” मात्र, कार्यकर्त्यांनी त्यावरही नाराजी व्यक्त करत, “पदाची गरिमा जपा, दारात उभं राहून आम्हाला न्याय मागावा लागतोय, हीच शोकांतिका आहे,” असे म्हणत संताप व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026