Vaishnavi Hagawane Case : फरार असताना राजेंद्र हगवणेचा अलिशान गाड्यात प्रवास, हॉटेलात मुक्काम; पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह

By: Editor_Pratik

On: Friday, May 23, 2025 7:31 AM

Vaishnavi Hagawane Case
Google News
Follow Us

पुणे : (Vaishnavi Hagawane Case) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे दोघेही तब्बल सात दिवस फरार असतानाही पुणे व परिसरात मोकाट फिरत होते, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी जरी ते “सापडत नाहीत” असा दावा केला असला, तरी मीडिया आणि चौकशी दरम्यान त्यांच्या ठिकाणांची स्पष्ट माहिती उघड झाली आहे.

राजेंद्र हगवणेचा सात दिवसांचा फरारी प्रवास

  • १७ मे – औंध रुग्णालयात दिसला, जेव्हा त्याच्या कुटुंबीयांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी तेथे आणण्यात आले होते. त्यावेळी तो स्पष्टपणे उपस्थित असतानाही पोलिसांनी अटक केली नाही.
  • १७ मे रात्री – आळंदीतील लॉजमध्ये मुक्काम
  • १८ मे – वडगाव मावळजवळ पौना डॅम येथील फार्महाऊस, बंडू फाटक यांच्या बलेनो गाडीतून प्रवास
  •  १९ मे – पुसेगाव, सातारा येथे अमोल जाधव यांच्या शेतात मुक्काम
  •  १९-२० मे – कोगनोळी, कोल्हापूर येथील हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम
  •  २१ मे – कोगनोळीतील प्रीतम पाटील यांच्या शेतावर मुक्काम
  •  २२ मे – पुण्यात परत

या संपूर्ण प्रवासात त्याने गाड्या बदलल्या, ठिकाणं बदलली, हॉटेलात राहिला, हे सर्व पोलिसांच्या नजरेआड घडले का? यावर संशय व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न : राजेंद्र हगवणे १७ मे रोजी औंध रुग्णालयात होता, याची पोलिस नोंद असूनही त्याला त्यावेळी अटक करण्यात आली नाही. त्यानंतर सात दिवस त्याचा ठावठिकाणा उघड असतानाही पोलीस निष्क्रीय का राहिले? २२ मे रोजी तो पुण्यात परत आला तेव्हा स्वतःहून शरण गेला की पोलिसांनी अटक केली? – हे अद्याप स्पष्ट नाही.

राज्यभरात संताप : राज्यभरातील नागरिक आणि महिला हक्क संघटनांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका आरोपीला इतकी मोकळीक मिळणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह लावत आहे, असे मत व्यक्त होत आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला तपास आणखी गंभीर वळण घेत असून पोलिसांच्या भूमिकेची चौकशीची मागणी होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026