Tax Officer Suicide : साखरपुड्यातच होणाऱ्या बायकोची बॉयफ्रेंडला मिठी, IT अधिकारी असलेल्या नवरदेवाला धक्का; नंतर घडलं असं की…

By: Editor_Pratik

On: Saturday, April 19, 2025 4:33 AM

nashik-tax-officer-suicid
Google News
Follow Us

Tax Officer Suicide : साखरपुड्यात नवरीने प्रियकराला मारली मिठी, लग्नाच्या दिवशीच इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची आत्महत्या, पण सत्य त्याहून भयानक

Tax Officer Suicide: नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्याच्या साखरपुड्यात त्याच्या होणाऱ्या पत्नीने आपल्या कथित प्रियकराला मिठी मारली होती. यानंतर तिचं प्रेमप्रकरण उघड झालं होतं. यामुळे अधिकारी नैराश्यात गेला होता. त्यातच तरुणीने लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. यामुळे अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशीच टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.

“गौरी खानच्या हाय-प्रोफाईल रेस्टॉरंटमध्ये ‘बनावट पनीर’? १९ वर्षाच्या इन्फ्लुएंसरच्या व्हिडिओनं उडवली खळबळ!”

हरेकृष्ण पांडे नाशिकमधील आयकर कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचं उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका तरुणीसह लग्न ठरलं होतं. वाराणसीतच त्यांचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरीने आपल्या कथित प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली होती. यामुळे तिचे प्रेमसंबंध उघड झाले. यामुळे हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात आले होते.

BIG NEWS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल; ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’

यानंतर हरेकृष्ण पांडे लग्न करण्यास नकार देत होते. यामुळे तरुणीने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन,” अशी धमकी तिने दिली होती. सतत होणारं ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर हरेकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केली. नाशिकच्या उत्तमनगर परिसरात त्यांनी गळफास लावून घेतला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लाडकी बहीण योजना : एप्रिलचा हप्ता १५०० रुपये मिळणार की फक्त ५००? जाणून घ्या सविस्तर माहिती!

“हरेकृष्ण पांडे इन्कम टॅक्स अधिकारी होते. ते इन्कम टॅक्स कॉलनीत राहत होते. त्यांचे वारणासी येथील त्यांच्या मूळगावी मोहिनी नावाच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. पण मुलीचे प्रेमसंबंध असल्याने आणि ती यांना मानसिक त्रास देत असल्याने तणावात जाऊन आत्महत्या केली. त्यांनी गळफास लावून जीवन संपवलं आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती. हरेकृष्ण यांचे भाऊ हरेराम यांच्या तक्रारीवरून आम्ही नवरीसह तिचा कथित प्रियकर आणि अन्य संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल,” असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितलं.

अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now