पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, थायलंडमधील तिघींसह सहा तरूणींची सुटका

By: Editor_Pratik

On: Saturday, April 26, 2025 12:05 PM

Massage_6-hasluqmqeo
Google News
Follow Us

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, थायलंडमधील तिघींसह सहा तरूणींची सुटका

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर खराडी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील तिघींसह सहा तरुणींची सुटका केली. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. मालकाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pakistanis living in Maharashtra : महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानींची आकडेवारी समोर; संख्या आश्चर्यजनक!

याप्रकरणी व्यवस्थापक लेनखौके किपगेन (वय. ३०, रा. मणीपूर) याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचा मालक विकास किशोर ढाले (वय ३०, रा. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी पुजा हडाळे यांनी फिर्याद खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी – मुंढवा रस्त्यावर मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली होती.

ताडी पिताना झालेल्या वादातून तिघांनी मिळून ज्येष्ठ नागरिकाचा केला खून; दोघांना अटक तर एकाच शोध सुरू

त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. मसाज सेंटरचा व्यवस्थापक किपगेन आणि मालक ढाले यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत थायलंडमधील तीन तरुणींसह सहाजणींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालायच्या आदेशाने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

SIM CARD NEWS : काय तुम्ही देखील रस्त्यावरून सिमकार्ड घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी…

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस कर्मचारी नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अर्जुन बुधवंत, अमोल भिसे आणि पथकाने ही कारवाई केली. मसाज सेंटरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी शहरातील ३३ मसाज सेंटरवर कारवाई करुन व्यवस्थापकासह मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now