ताडी पिताना झालेल्या वादातून तिघांनी मिळून ज्येष्ठ नागरिकाचा केला खून; दोघांना अटक तर एकाच शोध सुरू

By: Editor_Pratik

On: Saturday, April 26, 2025 8:50 AM

crime-16x-114846480
Google News
Follow Us

ताडी पिताना झालेल्या वादातून तिघांनी मिळून ज्येष्ठ नागरिकाचा केला खून; दोघांना अटक तर एकाच शोध सुरू

पुणे : पुण्यातील वानवडी भागात भागात ताडी पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी बेदम मारहाण केली.या घटनेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मलंग मेहबूब कुरेशी (वय 60, रा. शिवनेरीनगर,कोंढवा)असे खून झालेल्याचे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.तर आरोपी आदिल शेख, आरोपी आकाश धांडे आणि अन्य एक असे मिळून तिघांविरोधात वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वानवडीतील शांतीनगर भागात एका ताडी विक्री दुकानात मलंग कुरेशी गेले होते.त्यावेळी तिथे ताडी पित असताना, आरोपी आदिल शेख,आरोपी आकाश धांडे आणि अन्य एका सोबत किरकोळ कारणावरून वाद झाला.त्यावेळी तिघांनी मलंग कुरेशी यांना बेदम मारहाण केली.तर दुकानातील लोखंडी दरवाज्यावर ढकलून दिले.

यामध्ये मलंग कुरेशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली.त्यानंतर त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र त्यांचा उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी घोषित केले.

त्याच दरम्यान घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली.त्यामध्ये आरोपी आदिल शेख आणि आकाश धांडे यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.तर अन्य एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026