आजच्या वेगवान जगामध्ये अखंडित कनेक्टिविटी, अत्यावश्यक सेवा तातडीने उपलब्ध होणे आणि मनोरंजनाचे परवडण्याजोगे पर्याय यांची मागणी सातत्याने वाढत आहे. वी चा वन-स्टॉप शॉप प्लॅटफॉर्म, वी ऍपने या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. वी ऍपवर तुम्ही तुमचे वी अकाउंटशी संबंधित सर्व कामे करू शकता, पण हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. हे केवळ एक ऍप नाही तर तुमची पेमेंट्स, मनोरंजन आणि ई-कॉमर्सच्या गरजा, मागण्या सहजपणे पूर्ण करणारे सोल्युशन आहे. म्हणूनच आज लाखो ग्राहकांनी वी ऍपला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवले आहे.
स्पीड कमी असला तरी रिचार्ज करण्यात काहीच अडचण नाही
एखाद्या मोक्याच्या प्रसंगी डेटा संपणे ही खूप मोठी अडचण बनू शकते. आपल्या युजर्सना या तणावाला सामोरे जावे लागू नये यासाठी वी ऍपवर आहेत ‘अनलिमिटेड डेली डेटा पॅक्स’ त्यामुळे डेटा कोटा संपलेला असताना आणि स्पीड्स ६४ केबीपीएसपेक्षा कमी असताना देखील रिचार्ज करणे सहजशक्य आहे. रिचार्ज करण्यासाठी वायफाय किंवा दुसऱ्यांकडून हॉटस्पॉट मागून घेण्याची गरज उरत नाही. स्पीड्स कमी असताना देखील ऍपच्या इमर्जन्सी ऍक्सेसमुळे रिचार्ज, पेमेंट करणे किंवा काही मदत मागणे अगदी सहजशक्य आहे.
विशेष रिचार्ज ऑफर्स
वी ग्राहकांना वी ऍपवर काहीतरी अधिक जास्त मिळणे ही तर नेहमीचीच बाब आहे. ५७९ आणि ८५९ रुपयांच्या पॅक्सवर अतिरिक्त डेटा मिळणे असो किंवा ७९५ रुपयांच्या पॅकवर अतिरिक्त वैधता मिळणे असो किंवा इतर अनेक रिचार्जेसवर सरसकट सूट मिळणे असो, तुम्हाला अनेक विशेष ऑफर्स वी ऍपवर मिळत राहतात. वी ऍपवर केल्या जाणाऱ्या कोणत्याही रिचार्जवर कन्व्हिनियन्स फी द्यावी लागत नाही. इतकेच नव्हे तर, ऍन्युअल पॅक्ससोबत रिचार्ज करणाऱ्या वी युजर्सना १०० रुपयांपर्यंत विशेष सूट आणि ५० जीबी अतिरिक्त डेटाचा देखील आनंद मिळवता येतो.
युटिलिटी पेमेंट्स करणे अगदी सोपे
अनेक वेगवेगळ्या व्यवहारांची पेमेंट्स करण्यासाठी वी ऍप हा सहजसोपा आणि अतिशय सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे, महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी कन्व्हिनियन्स फी द्यावी लागत नाही. वीज बिल, पाईप गॅस, पाणी आणि ब्रॉडबॅन्ड बिले भरणे, डीटीएच व फास्टटॅग रिचार्ज करणे, एलपीजी सिलिंडर बुक करणे हे सर्व तुम्हाला या एकाच ऍपवर सहजशक्य आहे. या ऍपवर तुम्हाला मिळतात कर्ज परतफेडीचे अनेक वेगवेगळे पर्याय, त्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करणारे हे एक बहुउपयोगी टूल आहे.
वी आर्थिक सेवा
तुमच्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड शोधणे आणि त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया वी मुळे सर्वात सोपी झाली आहे. वी ऍपमध्ये तुम्ही सर्व प्रमुख बँकांच्या क्रेडिट कार्ड ऑफर्सची नीट माहिती घेऊ शकाल. हे एक असे वन-स्टॉप सोल्युशन आहे जिथे तुम्ही वेगवेगळ्या पर्यायांमध्ये तुलना करून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल असे परफेक्ट क्रेडिट कार्ड निवडू शकाल. सर्वोत्तम कॅशबॅक रिवॉर्ड्स आणि खास भेटवस्तू व सुविधांचा आनंद देखील याठिकाणी तुम्हाला मिळवता येईल.
वी–शॉपमधील विशेष ऑफर्स
वी ऍपमध्ये कनेक्टिविटीच्या पलीकडे जाऊन वी-शॉपमध्ये करण्यात येणाऱ्या दैनंदिन खरेदीवर बचत करण्याची आकर्षक संधी देखील युजर्सना मिळते. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि टाटा क्लिकसारख्या सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर विशेष सूट आणि डील्स याठिकाणी मिळवता येतात. झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी सेवांवर देखील सूट मिळवता येईल, ऍमेझॉन फ्रेश, बिगबास्केट आणि ब्लिंकइट सारख्या दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर देखील सूट मिळवता येईल. ओला आणि उबरकडून दररोजच्या प्रवासामध्ये बचत करता येईल.
वी मूव्हीज अँड टीव्ही ऍपसोबत प्रवासात असताना देखील मनोरंजनात खंड पडणार नाही
बिन्ज-वॉचिंग आवडत असलेल्यांसाठी, खेळांच्या टुर्नामेंट्सचा लाईव्ह थरार अनुभवण्यासाठी वी मूव्हीज अँड टीव्ही ऍप हे मनोरंजनाचे सर्वोत्तम केंद्र आहे. वी मूव्हीज अँड टीव्हीची सबस्क्रिप्शन वी ऍपमार्फत खरेदी करता येईल. ही सबस्क्रिप्शन ऍक्टिवेट केल्यावर वी मूव्हीज अँड टीव्ही ऍप डाउनलोड करून १७ ओटीटी प्लॅटफॉर्म्सना ऍक्सेस मिळवता येईल, यामध्ये डिस्ने+ हॉटस्टार, सोनीलिव, लायन्सगेट प्ले, झी५, सननेक्स्ट, फॅनकोड आणि इतर अनेक ओटीटीचा समावेश आहे. ३५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, ब्लॉकबस्टर सिनेमे, पॉडकास्ट आणि एक्सक्लुसिव्ह शो उपलब्ध असल्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचे काही ना काही इथे नक्की मिळेल. दर महिन्याला १५४ रुपयांपासून २४८ रुपयांपर्यंतच्या वी मूव्हीज अँड टीव्हीच्या सबस्क्रिप्शन्स म्हणजे अनेक वेगवेगळे ओटीटी अकाउंट्स मॅनेज करण्याचा परवडण्याजोगा पर्याय आहे. खर्चामध्ये बचत करून, अतिशय सुविधाजनक पद्धतीने मनोरंजनाचा आनंद मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
गेमिंगची मनमुराद मजा घेणे खूपच सोपे
वी ऍपमध्ये एक खास वी गेम्स सेक्शन आहे त्यामुळे गेमिंगची आवड असलेल्यांसाठी ही विशेष पर्वणी आहे. कोणतेही डाउनलोड किंवा इन्स्टॉलेशन न करता, प्रीमियर मोबाईल क्लाऊड गेमिंग सर्व्हिस – वी क्लाऊड प्लेवर प्रीमियम एएए गेम्स खेळता येतील. पझलपासून ऍक्शन आणि स्पोर्ट्सपर्यंत विविध प्रकारचे १०० पेक्षा जास्त ईस्पोर्ट्स तसेच कॅज्युअल गेम्स देखील इथे खेळता येतील.
कॅज्युअल गेमर असाल किंवा कॉम्पिटिटिव्ह गेमप्ले करायला आवडत असेल, वी गेम्समध्ये तुम्हाला मिळेल भरपूर मजा आणि मनोरंजन. काही निवडक गेम्स खेळून रिवॉर्ड्स व व्हाउचर्स देखील जिंकता येतील.
वी ऍप डाउनलोड का केले पाहिजे?
वी ऍप फक्त टेलिकॉम सेवांपुरते मर्यादित नाही, हे ऍप तुमचे जीवन सहजसोपे करते. ज्या-ज्या गोष्टींची गरज असते त्यासाठी तुम्हाला कनेक्टेड ठेवण्याचे काम हे ऍप करते. परवडण्याजोग्या किमतींना भरपूर मनोरंजन पुरवते आणि तुमच्या दैनंदिन खर्चांमध्ये आकर्षक बचत करण्याची संधी देते. आधुनिक ग्राहकांच्या सर्व गरजा हे ऍप पूर्ण करते, सुविधा, बचत आणि मनोरंजन सर्व काही हाताच्या बोटांवर मिळवण्यासाठी हे ऍप उपयुक्त आहे.
तुम्हाला सेवासुविधा पुरवण्यासाठी वी ऍप सुसज्ज आहे, आजच डाउनलोड करा आणि अधिक स्मार्ट व अधिक कनेक्टेड जीवनशैलीचा आनंद घ्या.