मंच्युरियनमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल, दोघांविरुद्ध गुन्हा

By: Editor_Manas

On: Monday, June 8, 2026 11:29 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, अंबाजोगाई : खाद्यपदार्थामध्ये गुंगीचे औषध मिसळून एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील २० वर्षीय तरुणीचा आरोपींकडून काही दिवसांपासून पाठलाग करण्यात येत होता. आरोपींनी तिला जबरदस्तीने मंच्युरियन खाऊ घातल्याचा आरोप असून त्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

त्यानंतर आरोपींनी पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. फेब्रुवारी ते जून या कालावधीत धमकावून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच आरोपींनी पीडितेकडून सुमारे तीन लाख रुपये आणि साडेसहा तोळे सोन्याचे दागिने उकळल्याचेही समोर आले आहे. याशिवाय तिला पुण्यातील एका लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी महेश करपे (रा. धारूर) आणि पवन कराड (रा. पांगरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 6, 2026

July 6, 2026

July 6, 2026

school-holidays-1-jpg-1731597974

July 6, 2026

July 5, 2026

July 4, 2026