- आधीपासूनच्या तसेच नवीन ग्राहकांना सर्व वी मूव्हीज अँड टीव्ही सबस्क्रिप्शन प्लॅन्ससोबत लायन्सगेट प्ले उपलब्ध असणार आहे.
भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी, वी ने लायन्सगेट प्ले या प्रीमियम स्ट्रीमिंग सर्व्हिससोबत धोरणात्मक भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीने टॉप-टीयर कन्टेन्टची विशेष लायब्ररी युजर्सना खुली करून दिली आहे.
ऍक्शन ब्लॉकबस्टर, आयकॉनिक फ्रॅन्चायजी, प्रचंड गाजलेले सिनेमे व सीरिज, जागतिक पुरस्कार सोहळे, विशेष प्रीमियर्स आणि अनेक वेगवेगळ्या भाषांमधील डब केलेला कन्टेन्ट असा भरगच्च खजिना सादर करून अतुलनीय मनोरंजन अनुभव लायन्सगेट मिळवून देईल.
या भागीदारीमुळे वीचा ओटीटी पोर्टफोलिओ अजून जास्त वाढणार आहे, अनेक वेगवेगळ्या प्रीमियम हॉलिवूड मूव्हीज, ओरिजिनल सीरिज, आंतरराष्ट्रीय टायटल्सची भली मोठी लायब्ररी सहज परवडण्याजोग्या किमतीला उपलब्ध होणार आहे.
वी मूव्हीज अँड टीव्ही हे ऍप ग्राहकांच्या वेगवेगळ्या मनोरंजन गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. एकाच ऍपमध्ये, एकाच सबस्क्रिप्शनमध्ये आघाडीचे ओटीटी एकत्र आणून वी ने आपल्या ग्राहकांना खूप मोठी सुविधा प्रदान केली आहे. डिस्ने+ हॉटस्टार, सोनीलिव, झी५पासून फॅनकोड फॉर स्पोर्ट्सपर्यंत तसेच सनएनएक्सटी, मनोरमामॅक्स, नम्माफ्लिक्स, क्लिक आणि चौपाल यासारखा क्षेत्रीय कन्टेन्ट आणि आता लायन्सगेट प्लेसोबत सहयोग करण्यात आल्यामुळे हॉलिवूडमधील सर्वोत्तम कन्टेन्ट याठिकाणी उपलब्ध झाला आहे.
३०० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, ३० पेक्षा जास्त लाईव्ह न्यूज चॅनेल्स देखील यामध्ये आहेत. हे सर्व वी मूव्हीज अँड टीव्ही ऍपवर पाहता येईल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही तसेच लॅपटॉप्स, टॅबलेट्सवर देखील याचा आनंद घेता येईल.
लायन्सगेट प्लेसोबत वी ने हातमिळवणी केल्यामुळे वी मूव्हीज अँड टीव्ही युजर्सना आता जागतिक पातळीवर अतिशय लोकप्रिय असलेला कन्टेन्टची विशाल लायब्ररी खुली होणार आहे, यामध्ये जॉन विक, द हंगर गेम्स आणि सॉ, तसेच पास्ट लाइव्ह्ज, टोकियो व्हाईस, पॅरिस हॅज फॉलन, नॉर्मल पीपल, ऑपरेशन फॉर्च्युन, प्लेन, हिटमॅन्स वाईफ्स बॉडीगार्ड, द आयरन क्लॉ, द बीकीपर, आर्केडियन आणि इतर अनेक टायटल्स इथे उपलब्ध आहेत.
जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळे प्राईमटाइम एमी अवॉर्ड्स, गोल्डन ग्लोब्स, क्रिटिक्स चॉईस आणि बाफ्टा अवॉर्ड्स इथे पाहता येतील. वी मूव्हीज अँड टीव्ही सबस्क्रायबर्सना प्रीमियम आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कन्टेन्ट सहज उपलब्ध होणार आहे.
नवनवीन विचार, संकल्पना आणि सर्वोत्तम मनोरंजन प्रदान करण्याप्रती वी ची वचनबद्धता लायन्सगेट प्लेसोबतच्या भागीदारीतून दिसून येते. लायन्सगेट प्लेसारखे नामांकित प्लॅटफॉर्म आणून वी ने भारतीय दर्शकांच्या बदलत्या व वाढत्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी एक समृद्ध व वैविध्यपूर्ण कन्टेन्ट इकोसिस्टिम डिझाईन करण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा प्रदर्शित केली आहे.