एचडीएफसी म्युच्युअल फंडातर्फे भारतात नव्या २५ शाखांचं उद्घाटन, आर्थिक सर्वसमावेशकतेप्रती बांधिलकी

By: Editor_Pratik

On: Thursday, January 9, 2025 8:58 AM

एचडीएफसी
Google News
Follow Us

एचडीएफसी म्युच्युअल फंड या भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपनीने देशाच्या विविध भागांत मिळून २५ नव्या शाखांचे उद्घाटन केले आहे. हा उपक्रम कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या व्याप्ती वाढवण्याच्या आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सोपी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

या नव्या शाखा म्हणजे बिझनेस सेंटर्स भरतपूर, भुसावळ, वाराचा, बोपाळ, वाकड, चित्तोडगढ, जालना, अझमगढ, पुर्णिया, सीतापूर, बस्ती, अराह, बदलापूर, काशीपूर, फिरोझपूर, बरसात, ब्रम्हपोर (मुर्शीदाबाद), बोलापूर, कोल्लम, खमाम, होसूर, हसन, नागेरकॉइल, विझानागरम आणि तंजावर येथे सुरू करण्यात येणार आहेत.

नव्या शाखांमुळे एचडीएफसी एएमसी भारतातील सर्वाधिक प्रमाणात सहज उपलब्ध असलेल्या वेल्थ क्रिएटर्सपैकी एक असून त्यातून कंपनीचे – भारतातील प्रत्येकासाठी संपत्ती निर्मिती करण्याचे उद्दिष्ट अधोरेखित झाले आहे. या विस्तारामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे नेटवर्क देशभरात २५० शाखांपर्यंत पसरलेले असून त्यामुळे शहरी व निम- शहरी भागातील नागरिकांना आर्थिक सेवा जवळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

लहान शहरे व उदयोन्मुख आर्थिक केंद्रांत शाखा सुरू करत कंपनीने आर्थिक साक्षरता वाढवण्याचे आणि दुर्लक्षित बाजारपेठांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. हा उपक्रम सेबीच्या भारतात आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे.

या महत्त्वाकांक्षी विस्ताराविषयी एचडीएफसी एएमसी लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, ‘एचडीएफसी एएमसीमध्ये आम्ही प्रत्येक भारतीयासाठी संपत्तीचे निर्माते होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

देशभरात नव्या २५ शाखा सुरू करण्यातून कंपनीची या उद्दिष्टाशी असलेली बांधिलकी दिसून आली आहे. प्रत्येक भारतीयाला सक्षम करणाऱ्या गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध करत आर्थिक चित्र बदलण्यासाठी आणि त्यांना देशाच्या आर्थिक विकासगाथेत सहभागी होण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026