एनपीसीआयतर्फे ब्रँड पोझिशनिंग ‘ऑलवेज फॉरवर्ड’ लाँच, नाविन्य, सर्वसमावेशकता आणि भारताच्या डिजिटल पेमेंट प्रगतीला चालना देण्याचे उद्दिष्ट

देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी ब्रँड कॅम्पेन लाँच

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या भारताच्या डिजिटल पेमेंट यंत्रणेचा कणा असलेल्या संस्थेने आज ‘ऑलवेज फॉरवर्ड’ हे नवे ब्रँड पोझिशनिंग आज लाँच करत भारताच्या आर्थिक व पेमेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्णता आणि सर्वसमावेशकतेप्रती असलेली बांधिलकी दर्शवली. एनपीसीआयचे नवे पोझिशनिंग वैयक्तिक व देशाच्या प्रगतीसाठी डिजिटल आर्थिक व्यवहार हा प्रमुख घटकांपैकी एक असल्याचा विश्वास आणखी बळकट करणारा आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे लाखो लोकांना प्रगती करण्यासाठी चालना मिळेल.

गेल्या दशकभरापासून एनपीसीआयने युपीआय, आयएमपीएस, रूपे, भीम, एईपीएस आणि एनईटीसी फास्टॅगसह भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. या प्लॅटफॉर्म्समुळे देशभरात डिजिटल व्यवहार सहजपणे उपलब्ध व सुरक्षित झाले असून पर्यायाने भारताला डिजिटल- फर्स्ट अर्थव्यवस्थेच्या दिशेने चालना मिळाली आहे. एनपीसीआयच्या दमदार पेमेंट पायाभूत सुविधांमुळे देशभरात कुठेही सफाईदार, कमी खर्चिक व्यवहार करणे शक्य झाले आहे. पर्यायाने प्रत्येक भारतीयाला डिजिटल आर्थिक सेवा सोप्या आणि पूर्ण विश्वासाने वापरता येतात.

‘ऑलवेज फॉरवर्ड’ पोझिशनिंगच्या केंद्रस्थानी भारताचे ‘स्ट्रायव्हर इकॉनॉमी’मध्ये होत असलेला विकास असून अशाप्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये लाखो लोकांना सातत्यपूर्ण प्रगतीची आस धरणे आणि आपली ध्येये साकार करण्यासाठी वेळ व स्त्रोत गुंतवणे शक्य झाले आहे. एनपीसीआयने या स्ट्रायव्हर्सना सक्षम करत ज्ज्वल भविष्याप्रती त्यांचा आशावाद द्विगुणित करण्याचे ध्येय ठेवले आहे. अत्याधुनिक पेमेंट सुविधा मिळवून देण्यासाठी एनपीसीआयने त्यांच्या आशावादाचे खऱ्या प्रगतीत रुपांतर करत नागरिकांना आत्मविश्वास व महत्त्वाकांक्षेसह पुढे जाण्यासाठी प्रेरणा देण्याचे ठरवले आहे.

एनपीसीआयचे मार्केटिंग प्रमुख रमेश यादव म्हणाले, ‘ऑलवेज फॉरवर्ड हे पोझिशनिंग प्रत्येक व्यक्तीमध्ये दडललेल्या धडपड्या वृत्तीचे, उज्ज्वल भविष्य आणि प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाचे प्रतीक आहे.

या पोझिशनिंगमध्ये आर्थिक व्यवहार सोपे व सुरक्षित करण्याचे तसेच वैयक्तिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी चालना देण्याचे उद्दिष्ट दडलेले आहे. एनपीसीआयचे ऑलवेज फॉरवर्ड हे पोझिशनिंग प्रगती, नाविन्य आणि डिजिटल पेमेंट्समध्ये भारताच्या भविष्याला आकार देण्याच्या क्षमतेला सलाम देणारे आहे.’

 या उपक्रमाचा एक भाग म्हणून एनपीसीआय याच नावाअंतर्गत आपले ब्रँड कॅम्पेन लाँच करत आहे. या कॅम्पेनअंतर्गत डिजिटल, प्रिंट आणि सिनेमा माध्यमातून सर्जनशील प्रचार केला जाणार असून देशभरातील वैविध्यपूर्ण प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. हे कॅम्पेन कशाप्रकारे एनपीसीआयच्या सुविधा नागरिकांना आयुष्यात सहजपणे आणि आत्मविश्वासह पुढे जाण्यासाठी सक्षम करतात यावर भर देणारे आहे.

प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरणांसह ‘ऑलवेज फॉरवर्ड’ कॅम्पेनने भारतातील महत्त्वाकांक्षी पुढच्या पिढीला – तरुण विद्यार्थी, तंत्रज्ञान प्रेमी आणि उद्योजकांना डिजिटल पेमेंट्सचा स्वीकार करत बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सहजपणे सहभागी होण्यासाठी प्रेरणा देण्याचे ठरवले आहे. हे कॅम्पेन विश्वास उभारणारे, एनपीसीआयचा प्रभाव विस्तारणारे, भारताच्या पेमेंट क्षेत्रातील सर्वसमावेशकता वाढवणारे आहे.

‘ऑलवेज फॉरवर्ड’ हे केवळ एक कॅम्पेन नाही, तर नाविन्यता आणि सर्वसमावेशकतेला चालना देण्याची एनपीसीआयची बांधिलकी आहे. या कॅम्पेनद्वारे एनपीसीआय देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक भारतीयाला पूर्णपणे डिजिटल भविष्यात सामील होण्यासाठी आवश्यक साधने मिळतील याची खात्री करत आहे.