उदयोन्मुख भारतीय तथा महाराष्ट्राची बॅडमिंटन स्टार मालविका बनसोड जेटसिंथेसिसच्या टॅलेंट मॅनेजमेंट डिव्हिजनमध्ये, रिअल स्पोर्ट्समध्ये सहभागी

नागपूरचा 23 वर्षीय शटलर रिअल स्पोर्ट्स रोस्टरमध्ये सहभागी झाली असून, ज्यामध्ये बॅडमिंटनची दिग्गज सायना नेहवाल आणि वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

तरुण आणि उदयोन्मुख भारतीय क्रीडा प्रतिभेची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सर्वसमावेशक पाठिंबा देण्यासाठी समर्पित, क्रीडा व्यवस्थापन, डिजिटल मनोरंजन व तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीवर असलेल्या जेटसिंथेसिसने भारतीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोडचे त्यांच्या प्रतिभा व्यवस्थापन कंपनी, Real Sports मध्ये स्वागत केले आहे.

सायना नेहवाल, क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या आयकॉन्सचा समावेश असलेल्या तारका रोस्टरमध्ये ही नवीन भर, उत्कृष्ट क्रीडापटूंना सक्षम बनविण्याच्या रिअल स्पोर्ट्सच्या वचनबद्धतेला बळकटी देते.

23 व्या वर्षी मालविकाने भारतीय बॅडमिंटनच्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक म्हणून तिचे स्थान निर्माण केले आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) द्वारे जागतिक क्रमवारीत 34 व्या क्रमांकावर असलेल्या मालविकाने हायलो ओपन फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय म्हणून या वर्षी इतिहास रचला आणि सुपर 1000 चायना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या एलिट रँकमध्ये सामील झाली. पाच आंतरराष्ट्रीय विजेतेपदांसह, मालविका भारतीय क्रीडा उत्कृष्टतेच्या नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करते.

रियल स्पोर्ट्ससोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना मालविका बनसोड म्हणाली, “माझ्या कारकिर्दीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर रियल स्पोर्ट्स कुटुंबात सामील होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. त्यांच्या कौशल्य आणि दूरदृष्टीने, मला खात्री आहे की, आम्ही आमच्या सामाईक उद्दिष्टे आणि मूल्यांशी जुळणाऱ्या नवीन संधी शोधू शकतो. मी डायनॅमिक भागीदारी आणि भविष्यात प्रभावी सहयोग निर्माण करण्याच्या संधीची वाट पाहत आहे.”

याबद्दल बोलताना, जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी म्हणाले, “जेटसिंथेसिसमध्ये देशाला प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मालविकाचा प्रवास ही प्रतिभा, धैर्य आणि चिकाटीची कहाणी आहे. अशा खेळाडूच्या पाठिशी रिअल स्पोर्ट्स उभी राहते. भारतातील जागतिक दर्जाच्या खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या आणि त्यांचे पालनपोषण करण्याचे आमचे मिशन आहे. आमचा एकात्मिक दृष्टिकोन मैदानावर आणि मैदानाबाहेर, या ताऱ्यांसाठी नवीन संधी कशा प्रकारे निर्माण करू शकतो, हे अनेक खेळांमधील खेळाडूंसोबतच्या आमच्या भागीदारीने दाखवून दिले आहे.”

रिअल स्पोर्ट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. तारिश भट्ट म्हणाले की, “मालविका बनसोड भारतीय बॅडमिंटन प्रतिभेच्या पुढच्या लाटेचे प्रतिनिधित्व करते. रिअल स्पोर्ट्समध्ये तिचे स्वागत करताना आम्हाला सन्मान वाटतो. आमचे ध्येय क्रीडापटूंना पारंपरिक भागीदारींच्या पलीकडे जाणाऱ्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना क्रीडा परिसंस्थेवर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्यात मदत करणे हे आहे. मालविकासोबत तिच्या आणि तिच्या वाढत्या चाहत्यांसाठी अर्थपूर्ण प्रतिबद्धता वाढविण्याची अपार क्षमता आम्हाला दिसत आहे.”

रिअल स्पोर्ट्सने क्रीडा प्रतिभा व्यवस्थापनामध्ये खेळाडूंना स्ट्रॅटेजिक ब्रँड सहयोग, सर्वांगीण करिअर डेव्हलपमेंट आणि अत्याधुनिक डिजिटल प्रतिबद्धता साधने उपलब्ध करून देऊन कामगिरीचा एक मजबूत रेकॉर्ड तयार केला आहे.

जेटसिंथेसिस विविध उपक्रमांद्वारे भारतातील तळागाळातील युवा क्रीडा प्रतिभा शोधण्यात आणि त्यांना पाठिंबा देण्यात आघाडीवर आहे. रिअल स्पोर्ट्स तरुण, आश्वासक प्रतिभेची ओळख आणि पालनपोषण करते, या व्यतिरिक्त ते महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील रत्नागिरी जेट्सचे मालक व व्यवस्थापन करते. अझीम काझी, निखिल नाईक, किरण चोरमले यांसह रत्नागिरी जेट्सने आपल्या संघातील काही भारतातील सर्वात रोमांचक क्रिकेट प्रतिभेचा गौरव केला आहे.
जेटसिंथेसिस तिच्या प्रमुख ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) सह विविध उपक्रमांसह भारतात ईस्पोर्ट्सच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठीही वचनबद्ध आहे.