न्यायालयाने ज्ञानेश महाराव यांचा अटकपूर्व जामीन नाकारून दोन महिने झाल्यानंतरही पोलीस निष्क्रियच!

ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा; अन्यथा अवमान याचिका दाखल करू! – प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट

      कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अन् धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याविषयी ज्ञानेश महाराव यांनी सोलापूर न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नाकारून दोन महिने झाले आहेतमात्र अद्यापही पोलिसांनी त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाहीहे अत्यंत संतापजनक आहेपोलिसांच्या अशा निष्क्रीय भूमिकेमुळे श्रीरामभक्तस्वामी समर्थभक्त आणि समस्त हिंदू समाज यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहेपोलीस प्रशासनाने ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्यााबद्दल आम्ही अवमान याचिका दाखल करूअसा इशारा ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी दिलाया संदर्भातील निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना या वेळी देण्यात आलेया वेळी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे श्रीप्रसाद पंडितहिंदु जनजागृती समितीचे श्रीराजन बुणगेश्रीदत्तात्रय पिसे आणि सनातन संस्थेचे श्रीहिरालाल तिवारी हे उपस्थित होते.

       भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९९ व ३०२ अन्वये अक्कलकोट पोलीस ठाणे येथे ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहेतसेच मान्यायालय सोलापूर यांनी या दखलपात्र गुन्ह्यात जामीन नाकारला आहेगुन्हा घडून तब्बल दोन महिने होऊनही कारवाई करण्यात आलेली नाहीमान्यायालयाचे आदेश असूनही अंमलबजावणी होत नसल्याने पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि निष्पक्षता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेएकूणच कारवाईत दिरंगाई केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावीअशी मागणीही या वेळी करण्यात आली.

      नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी सार्वजनिक मंचावर हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अत्यंत बदनामीकारक आणि अपमानास्पद विधाने केली होतीयामुळे अक्कलकोट पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहेयाच प्रकरणावरून महाराष्ट्रात एकूण पाच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेतअसे असतांनाही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाहीहिंदू सहिष्णु आहेतकायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवतातम्हणून त्यांच्या भावनेला ठेच पोहचवणार्‍यांना न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर करूनही अटक केली जात नाहीहे अनाकलनीय आणि संतापजनक आहेजर हीच घटना अन्य धर्माच्या संदर्भात घडली असतीतर पोलिसांनी लगेच आरोपीला अटक करून तुरुंगात टाकले असतेअसे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.