संयुक्त जयंती महोत्सव 2026 : बोपोडीत भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल

By: Editor_Pratik

On: Thursday, April 16, 2026 9:01 AM

Google News
Follow Us

प्रसिद्ध शाहीर व खंजिरी वादक मीरा उमप यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

पुणे : छ. शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी येथे आयोजित ‘संयुक्त जयंती महोत्सव 2026’ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) छ. शिवाजी नगर मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रसिद्ध शाहीर व खंजिरी वादक मीरा उमप यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भारूड व भीमगीतांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘भीमाला पहिले वंदन’ या गीताने झाली. याप्रसंगी आयोजक, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष , पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, अविनाश कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ‘जगाला सांग बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर’, ‘खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे’, ‘गावामध्ये गावं महू गाव’, ‘उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’, ‘VIP राहण’, ‘जिजाऊ सावित्री रमाई तुमच्या मध्ये दिसावी’, ‘दारामध्ये उभी राहून माझी रमाई रडायची’, ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे’ आणि ‘मी असा भीम राणा सरकार पाहिला’ अशी एकापेक्षा एक गाजलेली भीमगीते सादर करण्यात आली.

तसेच धम्मचारी वरभद्र यांनी  ‘चार्ली चॅप्लिन’ च्या वेशभुषेत ‘बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग’ या सादरीकरणांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सांस्कृतिक सोहळ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर अधिक दृढ झाला असून, भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महोत्सवात शुक्रवारी राहुल साठे यांचा भीमगीतांचा , तर शनिवारी लोककला दर्शन हा कार्यक्रम होणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026