वी युजर्सना यंदाच्या गणेशोत्सवात कुठूनही, कधीही घेता येणार लालबागचा राजा व अष्टविनायकांचे थेट दर्शन

  • वी युजर्सना त्यांच्या मोबाईल फोन्सवर वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये लालबागचा राजाचे थेट दर्शन घेता येणार. शेमारूच्या सहयोगाने ही सुविधा उपलब्ध करवून दिली जात आहे.
  • मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी आणि इतर अनेक देवांचे थेट दर्शन मिळणार.

संपूर्ण महाराष्ट्र भर गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. या दहा दिवसांमध्ये घरोघरी, विविध सार्वजनिक मंडळांमध्ये जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागलेली आहे.

संपूर्ण देशभरातील गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने मुंबईच्या सुप्रसिद्ध लालबागचा राजाचे थेट दर्शन वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर घेण्याची सुविधा उपलब्ध करवून दिली आहे.

त्यामुळे आता भक्तगण आपल्या घरून, अगदी आरामात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. कुठूनही, कधीही श्रीगणेशाचे आशीर्वाद मिळवण्याची सुविधा वी ने उपलब्ध करून दिली आहे.

७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या दहा दिवसांमध्ये वी युजर्सना लालबागचा राजाची शान घरबसल्या, कधीही अनुभवता येईल, आरत्या आणि उत्सवामध्ये सहभागी होता येईल. लालबागचा राजा, चार अष्टविनायक, श्री बाबुलनाथ मंदिर, श्री मुंबादेवी मंदिर आणि इतर अनेक मंदिरांचे थेट प्रक्षेपण वी उपलब्ध करून देत आहे. आपल्या मोबाईल नेटवर्कचा वापर करून लोकांना परंपरा व संस्कृतीच्या जवळ आणण्याप्रती वोडाफोन आयडियाची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

वी ऍप किंवा वी मुव्हीज अँड टीव्ही ऍप डाउनलोड करून, वी युजर्सना गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये लालबागचा राजा मंडपातील दिनकर्मे, ‘लाईव्ह आरत्या’ यामध्ये सहभागी होता येईल. शेमारूच्या सहयोगाने या सुविधेचा निःशुल्क लाभ घेता येईल.

गणेशोत्सव संपल्यानंतर देखील मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव आणि थेऊर येथील गणपतींचे थेट दर्शन वी युजर्सना मिळत राहणार आहे.