क्रीडा प्रबोधिनी संघांची पुन्हा चमक

पुणे, जुलै 2024: फॉर्मात असलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या दोन्ही संघांनी हॉकी महाराष्ट्र आयोजित हॉकी पुणे लीग 2024-25 च्या वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागात आपले वर्चस्व कायम राखले.

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर बुधवारी वरिष्ठ विभागात क्रीडा प्रबोधिनीने सेंट्रल रेल्वे, पुणे संघावर  7-4 अशी मात करताना दिवसाची विजयी सुरुवात केली. धैर्यशील जाधवचे (18वे, 51वे) दोन तसेच  सचिन कोळेकर (21वे), रोहन पाटील (30वे-पीसी), व्यंकटेश केंचे (36वे), अतुल डोंटकर (58वे), राहुल शिंदेचा (60वे) प्रत्येकी एक गोल त्यांच्या मोठ्या फरकाच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

मध्य रेल्वेकडून विशाल पिल्ले (45वे-पीसी), विनित कांबळे (52वे-पीसी), आदित्य रसाला (58वे-पीसी) आणि स्टीफन स्वामीने (60वे-पीसी) गोल केले.

त्यानंतर, कनिष्ठ विभागात क्रीडा प्रबोधिनी ‘ब’ संघाने पुणे मॅजिशियन्सचा 6-0 असा धुव्वा उडवला. गौरव पाटील (3रा आणि 14वा) आणि राजरत्न कांबळे (3रा), सूरज शुक्ला (6वा), सोहम रशीद (12वा) आणि विश्वनाथ अजिंक्यने (17वा) विजयात मोलाचा वाटा उचलला.

निकाल:
वरिष्ठ विभाग –

क्रीडा प्रबोधिनी: 7 (धैर्यशील जाधव 18वे, 51वे; सचिन कोळेकर 21वे; रोहन पाटील 30वे-पीसी; व्यंकटेश केंचे 36वे; अतुल दोंटकर 58वे; राहुल शिंदे 60वे) विजयी वि. सेंट्रल रेल्वे, पुणे: 4(विशाल पिल्ले 45वे-पीसी; विनित कांबळे 52वे-पीसी; आदित्य रसाला 58वा; स्टीफन स्वामी 60वा-पीसी). हाफटाईम: 3-0

कनिष्ठ विभाग –
क्रीडा प्रबोधिनी ‘ब’: 6(गौरव पाटील 3रा, 14वा; राजरत्न कांबळे 3रा; सूरज शुक्ला 6वा; सोहम रशीद 12वा; विश्वनाथ अजिंक्य 17वा) विजयी वि. पुणे मॅजिशियन्स: 0. हाफटाईम: 6-0

हॉकी लव्हर्स स्पोर्ट्स क्लब: 5(प्रणय गरसुंद 1ला, 52वा; हितेश कल्याणा 16वा, 17वा; स्वप्नील गरसुंद 23वा) विजयी वि. पीसीएमसी क्लब: 2 (वृषभ आव्हाड 27वा-पीएस, 39वा). हाफटाईम: 4-0.