पुणे १३ जून २०२४ : शाओमी या तंत्रज्ञान आणि नाविन्य क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी ने आज शाओमी १४ सीव्ही या आकर्षक आणि प्रतिथयश अशा शाओमी १४ मध्ये भर घातली आहे. लेशिया सह को इंजिनियर्ड अशा या शाओमी १४ सीव्ही ने मोबाईल इमेजिंग आणि स्मार्टफोन फोटोग्राफीची श्याओमीची परंपरा पुढे नेली आहे. शाओमी १४ सीव्ही मध्ये कॅमेर्याची कार्यक्षमता दुप्पट देण्यात आली असून त्याच बरोबर यामध्ये अजोडपणे आयकॉनिक डिझाईनची भाषा वापरुन श्याओमी १४ सिरीजची परंपरा सुरु ठेवली आहे, यामुळे या फ्लॅगशिप भागात आता नवीन उत्क्रांती झाली आहे. यामुळे आता शाओमीच्या सध्याच्या प्रत्येकासाठी अत्याधुनिक नाविन्य देण्याच्या परंपरेला अबाधित राखण्यात आले आहे.
शाओमी इंडिया चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुज शर्मा म्हणाले “ शाओमी १४ सिरीज मध्ये आम्ही स्मार्टफोन फोटोग्राफीच्या सीमा वाढवण्यासह नाविन्यपूर्ण डिझाईन आणि अजोड कार्यक्षमता दिली आहे. आम्ही नेहमीच आमची नाविन्यपूर्ण उत्पादने ही अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. शाओमी १४ सीव्हीच्या सुरुवाती मुळे आम्ही नाविन्याचे नवीन नियम पुन्हा लिहून स्मार्टफोन विभाग जे देऊ करत आहे त्याचे पुर्ननिर्माण करत आहोत. यामध्ये संपूर्ण फ्लॅगशिप अनुभव मिळून रोजच्या वापरासाठी बेंचमार्क ओलांडून जाणारे आकर्षक डिझाईन या सर्व गोष्टी या विभागातील कॅमेर्याच्या माध्यमातून आम्ही देऊ केल्या आहेत. शाओमी १४ सीव्ही हा केवळ एक फोन नाही तर ते एक स्टेटमेंट आहे.”
शाओमी १४ सिरीज ने आता मोबाईलची सर्वोत्कृष्टता अधिक वाढवून आकर्षक डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आहे. शाओमी १४ सीव्ही मध्ये आकर्षक फ्लोटिंग क्वाड कर्व्ह डिस्प्ले हा शाओमी १४ अल्ट्रा मधून घेण्यात आला आहे. या नाविन्यपूर्ण डिझाईन मुळे सुंदरता ही प्रत्यक्ष वापरात झळकते, परिणामी आकर्षक दृष्यमानतेसह आरामदायक वापरही करता येतो. हा या विभागातील अनोखा असा डिस्प्ले असून यामुळे खरोखर आकर्षक असा अनुभव प्राप्त होतो. या डिस्प्ले मध्ये १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट असल्याने चांगले स्क्रोलिंग मिळते तर डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशन आणि सपोर्ट मुळे ६८ बिलियन हून अधिक रंग दिसू शकतात व चांगला अनुभव मिळतो. शाओमी १४सीव्ही मध्ये गोरिला ग्लास व्हिक्टस २ असून यामुळे स्क्रीन अधिक काळ टिकण्यास मदत होते.
१४ सीव्ही च्या गाभ्यामध्ये नवीन पिढीतील फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ चिपसेट आहे. हा प्रोसेसर नेहमीच विभागातील सर्वोत्कृष्ट आयएसपी (इमेज सिग्नल प्रोसेसर) ला प्राधान्य देतो, जेणेकरुन समृध्द लेशिया कॅमेरा अनुभव वापरकर्त्यांना प्राप्त होतो. ४एनएम टीएमएससी प्रोसेस वर तयार केलेला आणि एक्स४ सुपर कोअर आणि क्वालकॉम ट्रिपल आयएसपी १८ बिट टेक्नॉलॉजी तसेच स्नॅपड्रॅगन ८ एस ३ सेट्स मुळे नवीन गती आणि चांगल्या कार्यक्षमतेने उर्जेचा वापर करता येतो.शाओमी १४ सीव्ही मध्ये ४७०० एमएएच बॅटरी असल्याने एका चार्ज मध्ये एका दिवसा पेक्षा अधिक काळ हा फोन टिकून राहतो. यांतील १६०० चार्ज सायकल्स मध्ये बॅटरी आपले आयुष्य हे चार वर्ष वापरल्यानंतरही ८० टक्के टिकवते. यातील इनबॉक्स ६७ वॉट टर्बो चार्जर मुळे वेळेवर अगदी फूल चार्ज होते. फोन मध्ये एलपीडीडीआर५एक्स रॅम हे १२ जीबी पर्यंत आणि यूएफएस ४.० ५१२ जीबी पर्यंत आहे, यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे भरपूर लोड मध्येही हा फोन चालतो. शाओमी १४ सीव्ही आता मॅचा ग्रीन, क्रुझ ब्ल्यू आणि शॅडो ब्लॅक या रंगात ८जीबी+२५६ जीबी या प्रकारात नेट इफेक्टिव्ह प्राईस रु ३९,९९९/- आणि १२ जीबी+५१२जीबी प्रकारात रु ४४,९९९ मध्ये २० जून २०२४ पासून फ्लिपकार्ट, एमआय.कॉम आणि श्याओमीच्या रिटेल पार्टनर्स कडे उपलब्ध असतील.