प्रतिनिधी मानस, छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावर फोन उचलून नये अथवा वापरू नये अशा वारंवार सूचना सांगितल्या जातात. मात्र असं असतानाही ऑनलाईन पेमेंट किंवा काही महत्त्वाचे फोन असल्याने फोन वापरले जातात. फोनची रिंग वाजली आणि गाडीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील एका पेट्रोल पंपावर हा धक्कादायक प्रकार घडला. बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरणं सुरू होतं. त्याच वेळी अचानक फोन वाजला, पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली.
जाणून घेण्यासाठी एथे क्लिक करा…
आग पाहून मोठा गोंधळ उडाला. त्या व्यक्तीनं गाडी पेट्रोल पंपपासून काही अंतर लांब नेली. पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
प्रसंगावधान राखत दुकजाकीस्वारांनी आणि पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तुम्हाला जर पेट्रोल पंपावर फोन वापरायची सवय असेल तर सावधान अशा दुर्घटना होऊ शकतात त्यामुळे सतर्क राहाणं गरजेचं आहे.