5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलचा नेमका फंडा काय? हॉटेलच्या विविध ‘स्टार’चे अर्थ जाणून घ्या..

दैनंदिन आयुष्यात, अनेक शब्द आपल्या कानावर पडत असतात, परंतु त्याचा नेमका अर्थ फार कमी लोकांनाच माहित असतो. आपण दररोज अशा अनेक गोष्टी ऐकतो, ज्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देखील नसते. आता तुम्हीच पाहा ना..हॉटेल, मोटेल आणि रिसॉर्ट हे शब्द आपल्या कानावर तर येतात, परंतु त्याबद्दल योग्य माहिती अनेकांना माहित नसते. त्याचप्रमाणे  तर हॉटेलमधील 3 स्टार, 4 स्टार, 5 आणि 7 स्टारमधील फरकही अनेकांना माहित नसतो. ज्याचे परिणाम आपल्याला अनेक वेळा लोकांना भोगावे लागतात. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत, जेणेकरून भविष्यात तुम्ही यांमध्ये कधीही गोंधळणार नाही, तसेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार हॉटेल निवडाल..

हॉटेलच्या ‘स्टार’चा नेमका अर्थ काय?

तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक हॉटेलला त्याच्या सुविधांनुसार रेटिंग दिले जाते. आता जर कोणी एका तारांकित म्हणजेच 1 स्टार हॉटेलमध्ये राहत असेल तर इथे राहण्याची सोय साधी आहे आणि किंमतही जास्त नसते. सुविधांपैकी प्रसाधनगृहे आणि गरम आणि थंड पाण्याची सोय येथे केली जाते. 2 स्टार हॉटेलमध्ये, अतिथींना एका तारांकित हॉटेलच्या सुविधांपेक्षा थोड्या जास्त सुविधा मिळतात. त्यांची किंमतही थोडी जास्त आहे. 3 स्टार हॉटेलमध्ये भाडे 2000 रुपयांपर्यंत आहे आणि खोली आकाराने थोडी मोठी असते. यामध्ये, एसी खोल्याही आहेत, इथे अतिथींना इंटरनेट आणि पार्किंग देखील मिळते. 4 स्टार हॉटेल्समध्ये सुट रूम आहेत आणि बाथरूममध्ये बाथटबची सुविधा आहे. यात मिनी बार आणि फ्रीज देखील असते. त्यानंतर 5 स्टार हॉटेल्सचा क्रमांक येतो. इतर हॉटेल्सच्या तुलनेत येथे जास्त सुविधा उपलब्ध आहेत. यात जिम आणि स्विमिंग पूल देखील असते आणि खोली मोठी असते. त्यांचे भाडेही पाच ते सहा हजार रुपयापासून सुरूवात आहे.

हॉटेल्सना रेटिंग कसे मिळते?

हॉटेल्सला स्टार रेट केले जातात, हे तुम्ही पाहिले असेलच. हे रेटिंग कोण देते आणि एखाद्या हॉटेलला 5 स्टार किंवा 7 स्टार म्हणायचे हे कसे ठरवले जाते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जगात अशी खूप कमी हॉटेल्स आहेत जी 7 स्टार आहेत. स्वत:ला 7 स्टार म्हणवणाऱ्या हॉटेल्समध्ये 5 स्टार हॉटेल्सपेक्षा अधिक आलिशान सुविधा आहेत. आग्राचा ताज फलकनुमा पॅलेस हे भारतातील एकमेव 7 तारांकित हॉटेल आहे. रूम, बाथरूम, लॉबी, रेस्टॉरंट, फूड, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल इत्यादी सुविधांनुसार हॉटेलचे रेटिंग दिले जाते. पर्यटन विभागाची कमिटी हॉटेलला भेट देऊन सुविधांच्या आधारे हे रेटींग ठरवते.