महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ९९९९ किलो मोफत धान्याचे वाटप

पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आचार्य भगवंत आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथावर गोळा झालेल्या ९९९९ किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आदर्श माता प्रमिलाबाई सांकला, जैन समाजाचे जाणता राजा विजयकांत कोठारी, महावीर फुड बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया, जितो अपेक्सचे उपाध्यक्ष विजय भंडारी, वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, शांतीनगर श्रीसंघाचे अध्यक्ष दिलीप कटारिया, महावीर प्रतिष्ठानचे पन्नालाल (बाबाजी) लुणावत, परिवहन सेल काॅंग्रेसच्या उपाध्यक्षा मनिषा फाटे आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना विजयकुमार मर्लेचा म्हणाले, “या पुण्यवान लोकांच्या साक्षीने विक्रमी धान्य वाटपाचा हा सोहळा पार पडला. माणिकचंद ग्रुपचे प्रकाश धारिवाल, ऋषी आनंदवनचे प्रणेते रमणलाल लुंकड, आमदार रवींद्र धंगेकर या सर्वांचे जय आनंद ग्रुप प्रकल्प महावीर फूड बँक पुणे यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या उदार मदतीमुळे आजवर सात लाख किलो धान्याचे मोफत वाटप करू शकलो आहोत. दिव्यांग, तसेच लालबत्ती विभागातील भगिनींच्या मुखात अन्नाचा घास प्रेमाने भरवू शकतो.”

“रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘एक मूठ धान्य’ या संकल्पनेतून महावीर फुड बँकेची स्थापना करण्यात आली. आचार्य भगवंत आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या उपदेशानुसार दुःखीतांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत सुरु आहे. अनाथ, दिव्यांग, वृद्धाश्रम व महिलाश्रमातील दुःखितांचे अश्रू पुसण्याचे काम करू शकतो, याचा आम्हा कार्यकर्त्यांना अभिमान आहे,” असेही मर्लेचा यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश धारिवाल, सिद्धिविनायक ग्रुप, रमणलाल लुंकड, महिला कार्यकर्त्यां पुष्पाताई कटारिया, पायल धारवा यांच्यासह प्रमोद छाजेड, शांतीलाल नवलाखा, प्रविण तालेडा, ईश्वर बोरा, शांतीलाल देसर्डा, अनिल फाटक, संतोष भुरट, संतोष कर्नावट, विजय चोरडिया, भारत कवाड, अनिल फाटक, विजय धोका, विजय पारख, महावीर प्रतिष्ठान व जय आनंद ग्रुप प्रकल्प महावीर फुड बँकेच्या सर्व सदस्यांनी मोलाची मदत केली.