पुणे, जून, २०२४ – रायन इंटरनॅशनल अकॅडमी बावधन आणि हिंजवडी शाखांनी पालकांसाठी अद्वितीय व पर्यावरणास अनुकूल इव्हेण्ट वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करत फादर्स डे साजरा केला. १२० हून अधिक उत्साही पालकांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि क्वॉड्रन हिल, हिंजवडी येथे १०० रोपे लावली. एनजीओ गो ग्रीनचे पाठबळ असलेल्या या उपक्रमाने वृक्षारोपणाचा प्रसार करण्यासोबत सहभागी कुटुंबांमध्ये निसर्गाप्रती सखोल संबंधाना चालना देण्यासाठी हायकिंग क्रियाकलापाचा देखील समावेश केला.
इव्हेण्टमध्ये पर्यावरणीय संवर्धनासह पितृत्वाला साजरे करण्यात आले, जे सर्वांगीण व्यक्तींना निपुण करण्याच्या अकॅडमीच्या मिशनशी संलग्न होते. वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभाग घेत पालक व मुले अर्थपूर्ण कार्यासाठी एकत्र आले, जेथे तरूण विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारी व केअरची भावना जागृत केली.
“आमचा विश्वास आहे की, यासारखे उपक्रम पालक व मुलांना अर्थपूर्ण कार्यासाठी एकत्र येण्याची अद्भुत संधी देतात,” असे रायन इंटरनॅशनल अकॅडमी, हिंजवडीच्या मुख्याध्यापिका सोनिला कोच्छर गिरोत्रा म्हणाल्या. “वृक्षारोपण करत आम्ही आमच्या तरूण विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारी व केअरची भावना जागृत करण्याची आशा करतो, ज्यामुळे भावी पिढ्यांसाठी हरित व आरोग्यदायी भविष्याप्रती योगदान देता येईल.”
रायन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला शाश्वत भविष्य घडवण्याप्रती त्यांच्या समुदायाच्या समर्पिततेचा अभिमान वाटतो आणि ते त्यांचे विद्यार्थी व पालकांमध्ये पर्यावरण संवर्धनाप्रती संस्कृतीला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहेत.
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा-डॉ.नीलम गोऱ्हे