पियाजिओ इंडियाने वाघोली, पुणे येथे नवीन कंपनी शोरूमसह आपले तीन-चाकी नेटवर्क विस्तारित केले

पुणे, भारत – जून १, २०२४: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) या इटायलियन ऑटो कंपनी पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंपनी आणि भारतातील आघाडीच्‍या स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स व इलेक्ट्रिक तीनचाकी (३ईव्‍ही)च्‍या उत्‍पादक कंपनीने वाघोली, पुणे येथे आपल्‍या नवीन कंपनी शोरूमचे उद्घाटन केले. महाराष्‍ट्राचे माननीय उपमुख्‍यमंत्री श्री. अजित पवार यांनी उद्घाटन समारोहाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच याप्रसंगी पियाजिओ वेईकल्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी आणि पियाजिओ वेईकल्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड येथील कमर्शियल वेईकल बिझनेस (डॉमेस्टिक)चे कार्यकारी उपाध्‍यक्ष श्री. अमित सागर हे देखील उपस्थित होते.

२८०० चौरस फूट जागेवर असलेले नवीन वाघोली शोरूम तीनचाकी विक्री अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, ग्राहकांना एकाच छताखाली उत्‍पादने व सेवांची सर्वसमावेशक श्रेणी देते. पारंपारिक इंटर्नल कम्‍बशन इंजिन (आयसीई) मॉडेल्‍सपासून अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक वेईकल्‍स (ईव्‍ही) पर्यंत हे शोरूम ग्राहकांच्‍या विविध गरजा व पसंतींची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले इंधन-केंद्रित सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती पियाजिओच्‍या कटिबद्धतेला दाखवते. तसेच, पूर्णत: सुसज्‍ज अत्‍याधुनिक वर्कशॉप व स्‍पेअर पार्ट्स फॅसिलिटीसह ग्राहक अपवादात्‍मक सेवा व स्‍पेअर पार्ट्स सपोर्टवर अवलंबून राहू शकतात, ज्‍यामधून ग्राहकांना त्‍यांच्‍या मालकीहक्‍क प्रवासादरम्‍यान परिपूर्ण मन:शांतीची खात्री मिळते. वर्कशॉप बारामतीमधील पियाजिओच्‍या प्‍लांटमध्‍ये प्रशिक्षण घेतलेल्‍या प्रमाणित मास्‍टर टेक्निशियन्‍सकडून त्रासमुक्‍त अनुभवाची खात्री देतो.  

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत पियाजिओ वेईकल्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्‍हणाले, “मी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवण्‍यासाठी महाराष्‍ट्राचे माननीय उपमुख्‍यमंत्री श्री. अजित पवार यांचे आभार मानतो. पियाजिओ इंडियामध्‍ये ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करणारी उच्‍च दर्जाची उत्‍पादने व सेवांना नेहमी प्राधान्‍य दिले जाते. पुण्‍यामध्‍ये नवीन तीन-चाकी कंपनी शोरूमच्‍या लाँचसह आम्‍ही रिटेल अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याप्रती आणि ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली अद्वितीय सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. ही अत्‍याधुनिक फॅसिलिटी आम्‍हाला पुणेकरांना शोधापासून विक्रीपर्यंत, तसेच विक्रीपश्‍चात सेवांपर्यंत आमची कटिबद्धता दाखवण्‍यास साह्य करेल. आमचे हे मॉडेल शोरूम उत्‍पादन श्रेणीमधील आमच्‍या क्षमतेला दाखवेल.”  

पियाजिओ वेईकल्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड येथील सीव्‍ही डॉमेस्टिक बिझनेस अँड रिटेल फायनान्‍सचे कार्यकारी उपाध्‍यक्ष श्री. अमित सागर म्‍हणाले, “वाघोली येथे स्थित नवीन शोरूम कंपनीसाठी नवीन रिटेल टचपॉइण्‍ट असण्‍यासोबत आमच्‍या रिटेल धोरणामधील मोठे पाऊल देखील आहे. शोरूमच्‍या लाँचसह आम्‍ही पुण्‍यातील आमच्‍या ग्राहकांच्‍या गरजांना प्राधान्‍य देत आहोत. शोरूममध्‍ये प्रशिक्षित कर्मचारीवर्गासह ऑन-द-स्‍पॉट एक्‍स्‍चेंज व फायनान्‍स सुविधा असतील. आम्‍हाला विश्‍वास आहे की हे शोरूम आमच्‍या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्‍ध करून देईल, तसेच त्‍यांच्‍या मालकीहक्‍क प्रवासादरम्‍यान परिपूर्ण मन:शांतीची खात्री देखील देईल.” 

उत्‍पादन पर्यायाव्‍यतिरिक्‍त शोरूम अपवादात्‍मक सेवा, सुसज्‍जपणे उपलब्‍ध असलेले स्‍पेअर पार्ट्स आणि पारदर्शक किंमत धोरणांसह विनासायास मालकीहक्‍क अनुभवाला प्राधान्‍य देते. एक-थांबा सोल्‍यूशन दृष्टिकोन नोंदणी व आर्थिक सहाय्यतेपासून विक्रीपश्‍चात्त केअरपर्यंत सर्व सुविधा देते, तसेच प्रत्‍येक पियाजिओ ग्राहकाला परिपूर्ण मन:शांती देते. पियाजिओने नुकतेच आपल्‍या आपे इलेक्ट्रिक तीनचाकीसाठी नवीन बॅटरी सबस्क्रिप्‍शन मॉडेलची घोषणा केली. या उल्‍लेखनीय उपक्रमाचा इलेक्ट्रिक वेईकल मालकीहक्‍क अधिक किफायतशीर व विनासायास करण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहक समाधानावरील फोकसमधून पियाजिओ वेईकल्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडची प्रत्‍येक टचपॉइण्‍टवर सर्वोत्तमता वितरित करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामधून प्रत्‍येक परस्‍परसंवाद विश्‍वसनीयता व विश्‍वासाचा दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍याची खात्री मिळते.