पवारांचा मावळा आढळरावांवर भारी ! राजकीय उलथापालथीने अमोल कोल्हेंचा विजय सोपा

By: Editor_Manas

On: Tuesday, June 4, 2024 11:50 AM

Google News
Follow Us

पुण्यातल्या शिरुर लोकसभा मतदारसंघाची यावेळी राज्यभर चर्चा झाली. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे तर अजित पवार गटाचे आढळराव पाटील यांच्यात थेट लढत झाली. आढळराव पाटलांनी हायटेक प्रचार आणि अमोल कोल्हेंच्या गावोगाव भेटी अन् भाषणं गाजले होते. शिरुरमध्ये यावेळी साधारण ५४ टक्के मतदान झाले होते.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु त्यांचा पराभव झालेला आहे.

शिरुर मतदारसंघात राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. सुरुवातीला अजित पवारांसोबत गेलेल्या कोल्हेंनी पुन्हा शरद पवारांसोबत राहाणं पसंत केलं होतं. तर आढळराव पाटलांनी शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडून तिकिट घेतलं होतं. परंतु शेवटी कोल्हेच विजयी ठरले आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय?

पुण्यातील शिरूर, भोसरी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि खेड-आळंदी या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो.

आंबेगावमध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आमदार आहेत, जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत. भोसरीमधून भाजपचे एकमेव आमदार महेश लांडगे हे आहेत. हडपसरमधून चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते हे आमदार आहेत तर शिरुरमध्येही राष्ट्रवादीचेच अशोक पवार हे आमदार आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026