महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन यांच्यातर्फे आयोजन

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय  यांच्यातर्फे ‘कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन ‘ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.महात्मा गांधी यांच्या विचारांच्या साहाय्याने जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात  दि. ७ आणि ८ जून रोजी,सकाळी साडे नऊ ते सायंकाळी ५ या वेळेत  ही कार्यशाळा गांधीभवन,कोथरूड येथे होणार आहे. डॉ. जॉन चेलादुराई आणि हेदर क्युमिंग (अमेरिका ) हे अभ्यासक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.कार्यशाळेसाठी ५०० रुपये शुल्क असून अधिक माहितीसाठी अन्वर राजन ९६६५८३२२२५,ऋचा देवकर ७७६९९६२७७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.