महिलांची मोफत कर्करोग तपासणी

By: Editor_Manas

On: Monday, June 10, 2024 8:25 AM

Google News
Follow Us

पुणे : रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब (सहकारनगर) आणि ‘लायन्स राहतेकर वूमन कॅन्सर डायग्नॉस्टिक सेंटर'(एल आर सी सी) यांच्यातर्फे आयोजित शिबिरात  स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ४६ महिलांची   मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली.हे शिबीर रविवार,दि.९ जून  २०२४ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत मामलेदार कचेरी समोर आयोजित करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भट्टड तसेच तरुण लेखक तुषार मालानी उपस्थित होते.मधुकर राऊत ,शारदा लडकत,राम बांगड यांनी मार्गदर्शन केले.महात्मा फुले मंडळ पुणे यांचे सहकार्य लाभले.राजेंद्र भट्टड म्हणाले,’महिलांच्या कर्करोग तपासणीचे असे उपक्रम घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर निदान झाल्यास अनेक भगिनींना चांगले जीवन जगता येईल.त्यातून अनेक कुटुंबाना स्वास्थ लाभेल’.  ‘महिलांमधील कॅन्सरचे  प्रमाण वाढत  असल्याने वेळीच तपासणी करून घ्यावी.दर पंधरा दिवसांनी असे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. महिलांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन राम बांगड,चंद्रकला बांगड,अवंतिका सोनावणे  यांनी केले. 

तरुण लेखक श्री. तुषार मालानी यांच्या ‘नो इडियट टॉक’ या पुस्तकाची तिसरी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.  त्यांनी टीव्ही आणि मोबाईल मुळे मुलांच्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामांचे कथन केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 11, 2026