पर्यावरणाची गीते गावून दिला झाडे वाचवण्याचा संदेश

झाडे लावा झा गायक राजेश दातार आणि प्रज्ञा देशपांडे यांनी गीते सादर केली. निमित्त होते वसुंधरा फाऊंडेशनच्या दुसरा वर्धापन दिन सोहळाचे यावेळी वृक्षप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमींचा एस. एम. जोशी सभागृहात सन्मान करण्यात आला आला. राजेश दातार व प्रज्ञा देशपांडे यांनी गायलेल्या मराठी व हिंदी गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी त्या फुलांच्या गंधकोशी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, ऋतु हिरवा, जाळीमंदी पिकली करवंद, माझे माहेर पंढरी, या जन्मावर या जगण्यावर, ये राते ये मौसम अशी अनेक दर्जेदार गीते सादर करण्यात आली. जयंत साने, अमन सैय्यद, अभिजित जायदे, राजा साळुंखे यांनी साथसंगत केली.  दातार यांनी सादर केलेल्या गीतांच्या मैफिलीला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याच बरोबर वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय माणिकराव भोसले यांनी दातार यांचा विशेष सन्मान केला.

सदरील कार्यक्रमाला  लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरदचंद्र पाटणकर, शुभांगी पाटणकर, उल्हास देशपांडे, मोहन ठोंबरे, रघुनाथ ढोले असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन शिल्पा देशपांडे यांनी  केले.