केविनकेअर एमएमएकडून १३ व्या चिन्नीकृष्णन इनोव्हेशन अवॉर्डस् २०२४ साठी नामनिर्देशनांचे आवाहन

केविनकेअर ने मद्रास मॅनेजमेंट असोसिएशन च्या सहयोगाने १३व्या चिन्नीकृष्णन इनोव्हेशन अवॉर्डस् २०२४ साठी नामनिर्देशने आमंत्रित केली आहेत. ज्या कंपन्यांचा आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील वार्षिक महसूल ५० कोटी रूपयांपेक्षा जास्त नसलेल्या कंपन्या या पुरस्कारांसाठी येथे- https://ckinnovationawards.in/ किंवा ९७८९९ ६०३९८ वर मिस्ड कॉल देऊन अर्ज करू शकतात.

नामनिर्देशने दाखल करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२४ आहे. या पुरस्कारातून दिवंगत श्री. चिन्नीकृष्णन यांच्या महत्त्वपूर्ण नवसंशोधनांचा गौरव केला जातो आणि स्टार्टअप्स तसेच मध्यम आकाराच्या कंपन्यांना त्यांच्या समाजातील अद्वितीय आणि महत्त्वाच्या योगदानासाठी गौरवान्वित केले जाते.

केविनकेअर-एमएमए चिन्नीकृष्णन इनोव्हेशन अवॉर्डस् तीन विशिष्ट श्रेणींमध्ये उद्योजकतेतील सर्वोत्तमतेचा गौरव करताना नावीन्यपूर्ण उत्पादने किंवा सेवांचा वेगळेपणा आणि प्रभाव यांना पुरस्कृत करतात. हे पुरस्कार नावीन्यपूर्णतांचा वेगळेपणा, व्याप्ती, शाश्वतता आणि सामाजिक लाभ यांच्यावर भर देतात.

विजेत्यांना १ लाख रूपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल आणि त्यांना मार्केटिंग, वित्तपुरवठा, डिझाइन, पॅकेजिंग, पेटंट अर्ज, संशोधन आणि विकास तसेच मनुष्यबळ अशा क्षेत्रांमध्ये संपूर्ण मदत केली जाईल.

केविनकेअरने या पुरस्काराची सुरूवात “फादर ऑफ दि सॅशे रिव्होल्युशन” म्हणून गौरवल्या जाणाऱ्या आणि केविनकेअर प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सी. के. रंगनाथन यांचे वडील दिवंगत श्री. आर. चिन्नीकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ केली. केविनकेअर-एमएमए चिन्नीकृष्णन इनोव्हेशन अवॉर्डची सुरूवात २०११ साली झाली असून तेव्हापासून आजपर्यंत विविध श्रेणींमध्ये ५० पेक्षा जास्त उद्योजकांच्या औद्योगिक प्रगतीला चालना दिली आहे.