पुणे, पिंपरी – डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी पुणे येथे नुकतेच TAVI आणि वॉल्व क्लिनिक सुरु करण्यात आले आहे . अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानानात अग्रेसर ट्रान्सकॅथेटर ॲओर्टिक वॉल्व इम्पांटेशन (टावी) ही प्रक्रिया अत्याधुनिक आहे. या प्रक्रियेद्वारे हृदयाला कुठलाही चिरा न देता, ओपन हार्ट सर्जरी न करता हृदयातून अन्य अवयवांना रक्तपुरवठा करणारी शुद्ध रक्तवाहिनी (ॲओर्टा) मधील वॉल्व (झडप) बदलविण्याची प्रक्रिया नुकतीच पिंपरी येथील डीपीयु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ८३ वर्षीय रुग्णावर करण्यात आली. ही या हॉस्पिटलमधील पहिलीच प्रक्रिया होती. मुख्य म्हणजे पूर्वी ही प्रक्रिया करण्यास ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वयस्क व सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असलेल्या रुग्णांवर ही प्रक्रिया शक्य नव्हती. या प्रक्रियेसह आता टावी व स्ट्रक्चरल हार्ट स्पेशलिस्ट, डीपीयु सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल TAVI आणि वॉल्व्ह स्पेशलिटी क्लिनिकचे संचालक डॉ. अनमोल सोनावणे यांनी डीपीयु सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने ‘वॉल्व्ह क्लिनिक’ला सुरुवात केली आहे. हे क्लिनिक पुणे व पिंपरी शहरातील रुग्णांना हृदयविकाराच्या अत्याधुनिक उपचारासाठी प्रत्येक सोमवारी उपलब्ध असेल.
८३ वर्षीय रुग्ण चार महिन्यांपासून दम लागणे, श्वास भरून येणे, पायावर सुज अशा हृदयविकाराच्या लक्षणांनी सहा महिन्यांपासून ग्रस्त होता. त्यांच्या शुद्ध रक्तवाहिनीची झडप (अॅओर्टिक वॉल्व) बंद झाल्याने रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाला होता. विविध चाचण्या केल्यानंतर डॉ. अनमोल सोनावणे यांनी त्यांना वॉल्व बदलविण्याचे सुचविले. वय हे एक महत्त्वाचे फॅक्टर बघता ‘ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व इम्पांटेशन’ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व कुठलीही चिरफाड न करता, हृदयावर शस्त्रक्रिया न करता वॉल्व बदलण्याची प्रक्रिया केली. रुग्णाला एक-दोन दिवसांनी इस्पितळातून सुटी देण्यात आली. आता ‘ओपन हार्ट सर्जरी’द्वारे चिरफाड न करता देखील गुंतागूंतीची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया आता डीपीयुमध्ये शक्य होत आहे.
रुग्णाचे वय आणि अन्य विकार बघता ओपन हार्ट सर्जरी करणे शक्य नव्हते. अशा वेळी ट्रान्सकॅथेटर अॅओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट एक प्रभावी उपचार आहे. यामध्ये अॅन्जियोग्राफी व अॅन्जियोप्लास्टी प्रमाणे हातातून एक नळी (कॅथेटर) रक्तवाहिनीद्वारे ह्रदयापर्यंत नेण्यात येतो. पेसमेकरद्वारे हृदयाची स्पंदने २५० बीट प्रति मिनिट पर्यंत वाढविण्यात येतात. हृदय स्थिर झाले की, कृत्रिम कॅथेटरद्वारे नेण्यात आलेल्या वॉल्वला हृदयात उघडण्यात येतो. कालांतराने तो स्थिर झाला की, कॅथेटर काढून घेतल्य जातो. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णास सुंगणी देण्याची गरज नसते. रुग्ण शुद्धीवर असताना ही प्रक्रिया होऊ शकते. चिरा देण्याची गरज नसल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका नसतो.
डॉ. अनमोल सोनावणे यांनी टावी आणि व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही प्रक्रिया भारतात करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी भारत आणि ३६ देशांमध्ये १५०० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. हे तंत्र ज्येष्ठ नागरिकांमध्ये जगण्याची एक नवी आशा घेऊन आली आहे. डॉ. अनमोल सोनावणे यांनी आता डीपीयुसोबतच्या सहकार्याने वॉव्ह क्लिनिकला सुरुवात केली आहे; जे पुणे व पिंपरी चिंचवडच्या आरोग्य यंत्रणेत मोलाची भर घालेल.
या यशाबद्दल डॉ डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांनी अभिमान व्यक्त केला आणि ते म्हणाले की, आमचे ध्येय हे नेहमीच अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व कुशल तज्ञ् डॉक्टरांच्या मदतीने आम्ही रुग्णहित साद्य करण्यावर भर देत आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण TAVI आणि वॉल्व्ह स्पेशलिटी क्लिनिकचा हृदयरोगाच्या रुग्णांना अधिकाधिक फायदा कसा होईल असे डॉ. पी.डी. पाटील म्हणाले.
डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी या तंत्रज्ञानाबद्द्ल बोलताना सांगितले की, या नव्या वॉल्व क्लिनिकमुळे जागतिक स्तरावरील वैद्यकीय उपचार पुण्यात उपलब्ध करून देण्याचा एक नवा आयाम आम्ही सिद्ध केला आहे.
यावर भाष्य करताना डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी,पुणे यांनी सांगितले की, “पुण्याच्या आरोग्य सेवेचा विस्तार होत असताना, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील व्हॉल्व्ह स्पेशालिटी क्लिनिक आज आशेचा किरण म्हणून उदयाला आले आहे, याचा हृदयाच्या रुग्णांना फ़ायदा होईल . रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेसह तंत्रज्ञानाच्या जोडीने कमीत कमी जोखमीसह सर्वोत्कृष्ट संभाव्य काळजी घेउन एक अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था म्हणून TAVI आणि व्हॉल्व्ह स्पेशालिटी क्लिनिकची ओळख करून देण्याचा मान आम्हाला मिळला याचा आनंद होत आहे. कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातील TAVI ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे.
डॉ. अनमोल सोनवणे (संचालक- TAVI आणि वॉल्व्ह स्पेशलिटी क्लिनिक, DPU सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे) हृदयरोगाने ग्रस्त वृद्ध वयोगटातील रुग्णांसाठी “TAVI किंवा TAVR ही प्रक्रिया वरदान ठरणार आहे. ओपन-हार्ट सर्जरीसारख्या गंभीर प्रक्रियेमध्ये रुग्ण सुधारणेची गती कमी असते, असाह्य वेदना, संसर्गाचा धोका याबाबतीत “TAVI किंवा TAVR ही प्रक्रिया रुग्णांना सुरक्षित बनवते. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे व्हॉल्व्ह स्पेशालिटी क्लिनिक सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण हे हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी सुसज्ज रुग्णालय आहे ज्यामुळे गंभीर रुग्णांच्या समस्यांवर सहजतेने उपचार करण्यात मदत होईल.”