गेल्या काही वर्षात अझरबैजानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार अझरबैजानला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या २०२३ मध्ये दुपटीने वाढून १२०००० वर पोहोचली होती, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटनात १००% वाढ झाली.
या आकर्षण पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने अझरबैजान आणि १२ इतर आफ्रिकन देशांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक सादर करत असल्याची घोषणा केली आहे. अझरबैजान आणि कॅमरून, सुदान, रवांडा, आयव्हरी कोस्ट, लिबेरिया, गिनिया, स्वाझीलँड, साऊथ सुदान, बेनिन, युगांडा, झाम्बिया आणि गिनिया बिसाऊ यासारख्या आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करत असलेले वी पोस्टपेड युजर्स फक्त ७४९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकसह अखंडित कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील.
वी पोस्टपेड युजर्सना परदेशात प्रवास करताना कनेक्टेड राहण्याचे विविध पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. यामध्ये २४ तासांचा, १०, १४ आणि ३० दिवसांचा पॅक यांचा समावेश आहे. वी मध्ये ‘ऑलवेज ऑन’ ही सुविधा आहे ज्यामुळे पॅक संपल्यानंतर कोणताही वापर केला गेल्यास महागडे इंटरनॅशनल रोमिंग चार्जेस भरण्यापासून युजर्सचा बचाव होईल.
रेन्टल चार्जेस | वैधता | डेटा | आऊटगोईंग लोकल आणि भारतामध्ये + इनकमिंग | एसएमएस | उर्वरित जगात आऊटगोईंग |
७४९ रुपये | २४ तास | १०० एमबी | ५० मिनिटे | ५ एसएमएस | दर मिनिटाला ३५ रुपये |
३९९९ रुपये | १० दिवस | २ जीबी | २०० मिनिटे | १० एसएमएस | दर मिनिटाला ३५ रुपये |
४९९९ रुपये | १४ दिवस | २ जीबी | २०० मिनिटे | १० एसएमएस | दर मिनिटाला ३५ रुपये |
५९९९ रुपये | ३० दिवस | ५ जीबी | ३०० मिनिटे | १० एसएमएस | दर मिनिटाला ३५ रुपये |
प्रत्येक पर्यटकाच्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आलेले सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक पुरवण्यासाठी वी वचनबद्ध आहे. या देशांना सामील करून घेतल्यामुळे आता वी युजर्सना जगभरातील ११७ देशांमध्ये किफायतशीर किमतींमध्ये मोफत इंटरनॅशनल रोमिंग पॅकचा आनंद घेता येईल.
वी इंटरनॅशनल रोमिंग पॅकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया याठिकाणी https://www.myvi.in/international-roaming-packs क्लिक करा. वी ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी सर्वोत्तम रोमिंग प्लॅन निवडा. जग तुमची वाट पाहत आहे, अमर्याद, अखंडित कनेक्टिव्हिटीसाठी वी बनेल तुमचा साथीदार!