महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी रत्नागिरी जेट्स संघाच्या जर्सीचे अनावरण

पुणे,27 मे 2024 – महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या (एमपीएल) दुसऱ्या पर्वासाठी गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी जेट्स संघाचे मालक व जेटसिंथेसिस कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजन नवानी, कंपनीचे वित्त संचालक राकेश नवानी, सह संघमालक महिंद्र लुल्ला, फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, रत्नागिरी जेट्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल चंदावरकर, मुख्य प्रशिक्षक रणजीत पांडे, कर्णधार अझिम काझीसह संघातील अन्य सर्व खेळाडू उपस्थित होते. दुसऱ्या पर्वाच्या मोहिमेस रत्नागिरी जेट्स संघ 2 जून रोजी कोल्हापूर टस्कर्स बरोबरच्या लढतीने सुरुवात करणार आहे. या दोन संघातच पहिल्या पर्वाची अंतिम लढत झाली होती.  

संघाच्या नव्या जर्सीत विशाल आणि शक्तिशाली समुद्राचे प्रतिक दाखविणाऱ्या निळ्या रंगाचा समावेश असून, हा रंग आमची ताकद आणि लवचिकता दर्शवतो. जर्सीच्या समोरच्या बाजूवर असणारा एक सुवर्ण तारा आमच्या गतवर्षीच्या विजेतेपदाची आम्हाला आठवण करुन देतो आणि नव्या मोहिमेसाठी प्रेरित करतो. याखेरीज जर्सीवर कोरण्यात आलेली सोनेरी रंगाची जेट्स आमच्या संघात असलेली गतीशील उर्जा आणि सामर्थ्याचे दर्शन घडवते.

रत्नागिरी जेट्सचे ध्येय उच्च आणि उत्कृष्टता उद्दिष्ट असा आहे. जेटसिंथेसिस संघाच्या वर्षभरातील विकासावर विश्वास ठेवतो आणि भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करू शकणाऱ्या खेळाडूंचा सातत्याने शोध घेत असतो. आम्ही संघाला शुभेच्छा देतो, असे रत्नागिरी जेट्स संघाचे मालक राजन नवानी यांनी सांगितले.

सचिन सागा रियल क्रिकेट आणि स्कायईस्पोर्ट्स, डिजिटल एंटरटेन्मेंट आणि वेलनेस अशा नावाने कंपनीने ई-स्पोर्टससारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर पदार्पण केले आहे. रत्नागिरी जेट्स संघ आपल्या भागात क्रिकेट तळागाळात रुजविण्यासाठी कटिबद्ध आहे. जेट्स क्लबच्या एकत्रित प्रयत्नांना याचे श्रेय जाते. संघाकडे वरिष्ठ खेळाडूंबरोबरच 14, 16, 19 आणि 23 वर्षांखालील गटातील खेळाडूंनाही करारबद्ध करण्यात आले आहे.

एमपीएलच्या नव्या पर्वातील नव्या आव्हानांसाठी आम्ही सज्ज आहोत. आमचा खेळाडूंवर पूर्ण विश्वास असून, या नव्या पर्वात सर्वोत्तम कामगिरीसाठी आम्ही संघाला शुभेच्छा देतो, असे संघ मालक राकेश नवानी यांनी सांगितले.

क्रांती डिस्ट्रिब्युटर्स हे या संघाचे सह संघमालक असून फ्लिटगार्ड फिल्ट्रम कंपनी हे या संघाचे प्रायोजक आहेत. अझिम काझीच्या नेतृत्वाखालील संघात अभिषेक पवारसह (यष्टीरक्षक) अखिलेश गवळे, धीरज फटांगरे, दिव्यांग हिंगणेकर, किरण चोरमले, क्रिश शहापूरकर, कुणाल थोरात, निखिल नाईक (यष्टीरक्षक), निकित धुमाळ, पियुष कमल, प्रदीप दाढे, रोहित पाटील, साहिल चुरी, संग्राम भालेकर, सत्यजीत बच्छाव, तुषार श्रीवास्तव, वैभव चौघुले, विजय पवळे, यश बोरकर, योगेश चव्हाण यांचा समावेश आहे.

लिलाव आणि तयारीसाठी वेळ मिळाल्यानंतर, महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी आमचा संघ अत्यंत संतुलित आणि सज्ज आहे. आमची विचारधारा नेहमीच सर्वोत्कृष्ट क्षमतेनुसार खेळण्याची राहिली आहे, तीच आम्हाला पहिल्या आवृत्तीत विजेतेपदापर्यंत घेऊन गेली आणि आम्ही त्याच पद्धतीने खेळत राहण्यास उत्सुक आहोत. रत्नागिरी जेट्सने नेहमीच प्रक्रिया आणि तयारीला महत्व दिले आहे आणि हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या सर्व कामांवर आम्हाला विश्वास आहे, असे संघाचे प्रशिक्षक रणजीत पांडे यांनी सांगितले.

आम्ही लीगची वाट पाहत आहोत, तयारी उत्कृष्ट झाली आहे. सामना सुरू झाल्यावर प्रत्येककजण त्यांच्या भूमिकेची जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या आवृत्तीत चाहत्यांकडून जसे पाठबळ मिळाले, तसेच याही पर्वात मिळेल, असे कर्णधार अझिम काझी म्हणाले.

रत्नागिरी संघाचे सामने –

2 जून 2024 : रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (सायंकाळी 7 वा.)

4 जून 2024 :  रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (दुपारी 2 वा.)

5 जून 2024 :  रत्नागिरी  जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स (सायंकाळी 7 वा.)

6 जून 2024 :  रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स (सायंकाळी 7 वा.)

8 जून 2024 : रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा (दुपारी 2 वा.)

9 जून 2024 :  रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (दुपारी 2 वा.)

11 जून 2024 : रत्नागिरी  जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (सायंकाळी 7 वा.)

12 जून 2024 : रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स (सायंकाळी 7 वा.)

14 जून 2024 :  रत्नागिरी  जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स (दुपारी 2 वा.)

16 जून 2024 :  रत्नागिरी  जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा (सायंकाळी 7 वा.)