ट्रूकॉलरने पार केला ४० कोटी सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा

पुणे,३० मे,२०२४: संपर्क पडताळणी आणि नको असलेले संभाषण ‘ब्लॉक’ करण्यासाठी अग्रगण्य जागतिक मंच असलेल्या ट्रूकॉलरने ४० कोटी वापरकर्त्यांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची घोषणा केली. 

ट्रूकॉलर अनेक वेगवेगळ्या भौगोलिक बाजारपेठांमध्ये वेगाने वाढत असून यंदा ३१ मार्चपर्यंत वापरकर्त्यांचा आकडा १.०१ कोटी होईल.

“दरमहा ४० कोटी सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणे ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु त्याच वेळी, ट्रूकॉलरसारख्या उपयांची गरज लक्षणीयरित्या अधिक आहे, हे आम्ही जाणतो. फोनवरील नको असलेले संभाषण, स्पॅम आणि फसवणुकीची समस्या दुर्दैवाने व्यक्ती आणि व्यवसाय या दोघांसाठी तापदायक ठरते आहे. नवीन तंत्रज्ञान आणि धोकेबाजांकरिता पैसे कमावण्याच्या वाढत्या संधी विकासाला चालना देत आहेत. फोन कॉल किंवा एसएमएसच्या आधी, दरम्यान आणि नंतर आमच्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे अॅप विकसीत करणे आणि नवीन कार्यक्षमता जोडणे सुरू ठेवतो, असे Truecaller’चे सह-संस्थापक आणि सीईओ अॅलन मामेदी म्हणाले