पुणे, मे २०२४ – जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आभूषण विक्रेता समूह आणि डेलॉइटच्या लक्झरी उत्पादनांच्या जागतिक क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर असलेल्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने सनदशीर व्यवहार श्रेणीतील देशातील प्रतिष्ठित १३ व्या वार्षिक लीगल एरा – भारतीय कायदेसंमत व्यवहार पुरस्कार पटकावला आहे. कायदेसंमत उत्कृष्टता आणि नैतिक व्यवसाय पद्धतींबद्दल कंपनीची बांधिलकी अधोरेखित करून कंपनीला प्रतिष्ठित ‘कम्प्लायन्स अँड रिस्क मॅनेजमेंट टीम ऑफ द इयर २०२३-२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्पर्धात्मक रूपात आदित्य बिर्ला समूह, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, ह्युंडाई मोटर्स इंडिया लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, टाटा केमिकल्स, टाटा स्टील मिनी लिमिटेड, टाटा केमिकल्स, एलटीआय माइंड ट्री आणि इतर अनेक प्रतिष्ठित उद्यम संस्थांना मात देत मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. पुरस्काराने मिळवून दिलेली मान्यता ही अनुपालन आणि जोखीम व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कंपनीच्या अनुकरणीय कामगिरीवर प्रकाश टाकते, जी उद्यम सुशासनाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सची सर्वोच्च मानकांना शिरोधार्य मानणाऱ्या तिच्या समर्पण आणि बांधिलकीचा प्रत्यय देणारी आहे.
भारताचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण, न्यायमूर्ती अर्जन सिक्री आणि न्यायमूर्ती दीपक वर्मा यांसारख्या कायदेशीर दिग्गजांचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित परीक्षण मंडळाच्या देखरेखीखाली पुरस्कार निवड प्रक्रियेने मलाबार गोल्ड आणि डायमंड्सच्या कायदेसंमत व्यवहारातील अपवादात्मक योगदानाला अधोरेखित केले.
हॉटेल ताज पॅलेस, नवी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यामध्ये भारताचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांच्यासह दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे प्रतिनिधित्व करताना, उपाध्यक्ष केपी अब्दुल सलाम, कायदेशीर आणि उद्यम व्यवहार विभागाचे समूह प्रमुख राजीव नायर आणि कंपनी सेक्रेटरी सी. आशिक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कंपनी सेक्रेटरी स्तरावर चालवले जाणारे नेतृत्वदायी उपक्रम आणि कायदेशीर अनुपालनाबाबतची सावधगिरी यामुळे कंपनी या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे. नैतिक व्यवसाय पद्धती, पारदर्शक आणि व्यावसायिक निधी व्यवस्थापन आणि ईएसजी तत्त्वांवर आधारित व्यवसाय योजनांमुळे कंपनीला देशातील इतर मोठ्या कॉर्पोरेट्सच्या तुलनेत अनुपालन आणि जोखीम व्यवस्थापन संघ श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
पुरस्काररूपी मान्यता मिळाल्याबद्दल, मलाबार समूहाचे अध्यक्ष, एमपी अहमद यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, “आम्हाला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. कंपनी सचिवांच्या नेतृत्वाखाली होत असलेले उत्कृष्ट कार्य कौतुकास्पद आहे. आमचे ध्येय, ‘मेक इन इंडिया, मार्केट टू द वर्ल्ड’ असे असून, रोजगाराच्या संधी निर्माण करून आणि कठोर अनुपालन मानकांचे पालन करून देशाच्या समृद्धीमध्ये योगदान देण्याप्रती आमचे समर्पण यातून अधोरेखित होते.”
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स सर्व नियामक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करून आणि व्यावसायिक संस्था, वित्तीय संस्था आणि सरकारी नियामकांशी पारदर्शक