ह्युंडाई मोटर इंडिया लि.आणि लक्ष्मी ग्रुप तर्फे नेपाळच्या पहिल्या ऑटो असेंब्ली प्लांटमध्ये ह्युंडाई वेन्यूची असेंब्ली सुरू

पुणे, मे 2024: ह्युंडाई मोटर इंडिया लि.आणि लक्ष्मी ग्रुप तर्फे नेपाळमध्ये ह्युंडाई वेन्यू ची स्थानिक असेंब्ली सुरू केली आहे.नेपाळमधील या पहिल्या ऑटोमोबाईल असेंब्ली प्लांटचे उद्घाटन नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पा कमल दहाल आणि नेपाळमधील कोरियाचे राजदूत ते-यंग पार्क यांच्या उपस्थितीत झाले.

याप्रसंगी बोलताना ह्युंडाई मोटर इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उनसू कीम म्हणाले की,नेपाळमधील या प्लांटमध्ये वार्षिक 5000 युनिटस असेंबल करण्याची स्थापित क्षमता आहे आणि ह्युंडाई वेन्यू हे पहिले स्थानिकरित्या असेंबल केलेले मॉडेल असेल.