तुम्हांला माहिती आहे का की ‘मैं हूँ साथ तेरे’मधील किआन हा सेटवर अभिनेता करण वोहरा साठी ‘डंबबेल’ आहे?

By: Editor_Manas

On: Friday, May 17, 2024 8:03 AM

Google News
Follow Us

झी टीव्हीवरील हल्लीच सुरू झालेली मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’ आपल्या प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंधांकडे पाहण्याच्या निरागस दृष्टीसह प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ऑनस्क्रीन जान्वी (उल्का गुप्ता) आणि तिचा मुलगा किआन (निहान जैन) यांच्या नात्याने आणि मालिकेच्या सुंदर कथानकाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडले आहे. नुकत्याच झालेल्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कसे जान्वी आपल्या मुलाला मोठा करण्यासाठी संघर्ष करत आहे तर दुसऱ्या हाताला किआन आणि आर्यमन करण वोहरा यांच्यात सुंदर नाते निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. तो त्याला आपला ‘हिरो’ म्हणून हाक मारतो.

प्रेक्षकांना आर्यमन आणि किआनमधील हे नाते आवडत असून ऑफस्क्रीनही करण आणि निहान यांच्यात छान नाते बनले आहे. निहानला करणबरोबर राहायला आवडते आणि तो अनेकदा करणच्या मेकअप रूममध्येच आपला बहुतेक वेळ घालवतो. तिथे ते दृश्यांचा सराव करतात आणि मोकळ्‌या वेळात मजेदार खेळही खेळतात. पण निहानचा आवडता खेळ तो असतो जेव्हा तो करणची ‘डंबबेल’ बनतो. हा खेळ मजेदार तर आहेच पण त्याचबरोबर सेटवरच करणच्या दंडांचा व्यायामही होतो.

करण म्हणाला, “अगदी पहिल्या दिवसापासूनच निहानसोबत चित्रीकरण करताना खूप मजा येत आहे आणि तो नक्कीच अतिशय खेळकर मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमच्यात छान दोस्ती झाली आहे. मला त्याच्यासोबत खेळायला आवडतं आणि आम्ही वेळ एकत्र घालवतो की तो आता माझा ‘बडी’ बनला आहे. आमच्या ऑनस्क्रीन नात्याप्रमाणेच ऑफस्क्रीनही आम्ही दोस्त आहोत. आणि आता मी हे विश्वासाने म्हणू शकतो की तो माझ्या ‘डंबबेल’ दोस्त बनला आहे. दोन दृश्यांमध्ये किंवा जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तो माझ्या हातांवर लटकतो आणि मी त्याला वरखाली झुलवतो, जणू काही मी ‘बायसेप कर्ल्स’ करत आहे. त्याला ते खूप आवडतं, त्याच्यासाठी तर हा खेळच बनला आहे आणि माझ्यासाठी ते एक मजेदार फिटनेस सेशन असते.”

करण आणि निहान यांच्यातील नाते अतिशय गोड असून प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की काय किआन आर्यमन आणि जान्वी यांना एकत्र आणेल? काय जान्वी करणला स्वीकारेल?

अधिक जाणून घेण्यासाठी पहा ‘मैं हूँ साथ तेरे’ दररोज संध्याकाळी 7.30 वाजता फक्त झी टीव्हीवर

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now