तुमचे आरोग्य धोक्यात घालू नका : बेकायदेशीर आणि चिनी-केमिकल असलेले मॉस्किटो रिपेलेंट्समध्ये आहेत धोके  

भारतातील डासांविरुद्धचा लढा सतत आणि चालू आहे. हे लहान कीटक वरवर क्षुल्लक वाटत असले तरी डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या घातक रोगांचा प्रसार करून महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बरेच लोक बाजारात सर्रास उपलब्ध असलेल्या डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीकडे वळत आहेत. मात्र डासांपासून बचाव करणाऱ्या बेकायदेशीर आणि मंजूर नसलेल्या अगरबत्तीच्या मोठ्या प्रमाणात वापरामुळे देशात सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सरकार- न्यता असलेल्या आणि प्रतिष्ठित उत्पादकांनी बनवलेल्या डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीशी संबंधित हा मुद्दा नसला तरी बेकायदेशीर, बनावट आणि मंजूर नसलेल्या उत्पादनांची समस्या कायम आहे. हे संकट न जाणता अनेक लोक काहीही न समजता अशा अगरबत्ती वापरत आहेत. चीनमधून बेकायदेशीररीत्या आयात केलेल्या अनियंत्रित आणि नोंदणी नसलेल्या रसायनांचा यातील सर्रासपणे वापर हे चिंतेचे कारण आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कोणत्याही तपासण्या आणि मंजुरीशिवाय या अगरबत्त्या वापरल्या जातात.

या अनियंत्रित अगरबत्त्या त्यांच्या कमी किमतीमुळे आणि व्यापक उपलब्धतेमुळे खरेदी कराव्या वाटतात. पण त्यात अनेकदा योग्य गुणवत्ता नियंत्रण आणि पारदर्शकतेचा अभाव असतो. या उत्पादनांमध्ये अनियंत्रित आणि नोंदणी नसलेली रसायने आहेत, जी चीनमधून आयात केली जातात. सरकारी प्राधिकरणांकडून आवश्यक कीटकनाशक परवान्याशिवाय याचा साठा केला जातो आणि त्या वितरित केल्या जातात. भारतातील अशा अनियंत्रित, नोंदणीकृत नसलेल्या आणि अप्रमाणित रसायनांमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आणि धोके निर्माण होऊ शकतात.

शिवाय, घरगुती कीटकनाशके म्हणून या अनियंत्रित अगरबत्तीचा प्रभावही संशयास्पद आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIBRC) सारख्या सरकारी संस्थांनी मंजूर केलेल्या उत्पादनांच्या विपरीत म्हणजे, या अगरबत्त्यांची प्रमाणित चाचणी केलेली नसते आणि सक्रिय घटकांचा योग्य प्रमाणात वापरही केलेला नसतो. त्यामुळे डासांपासून पाहिजी तशी सूटका होत नाही आणि त्यामुळे ग्राहकांना जे आजार टाळायचे असतात ते होण्याचा धोका निर्माण होतो. 

बेकायदेशीरपणे आयात केलेल्या, अनियंत्रित रसायनांचा समावेश असलेल्या बेकायदेशीर घरगुती अगरबत्ती खरेदी करू नये, असा सक्त सल्ला  HICA नागरिकांना देते. त्याऐवजी त्यांनी विश्वासार्ह उत्पादकांकडून आणि केंद्रीय कीटकनाशक मंडळाने मंजूर केलेल्या सुरक्षित पर्यायांची निवड करावी, यासाठी HICA प्रोत्साहित करते. याव्यतिरिक्त, सरकारने मंजूर केलेले सुरक्षित पर्याय बाजारात उपलब्ध आहेत जसे की गुडनाइट अगरबत्ती. ही भारतातील पहिली सरकारी नोंदणीकृत डासविरोधी अगरबत्ती आहे.

डासांमुळे होणा-या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. माहितीपूर्ण निवड करून आणि सरकार-मंजूर उत्पादने खरेदी करून, ग्राहक याची खात्री बाळगू शकतात, की ते स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आणि सुरक्षित उपाय वापरत आहेत. थोडक्यात, ग्राहकांनी जागरूक असले पाहिजे आणि स्वस्त, अनियंत्रित, परवानगी