कलर्सचे ‘खतरों के खिलाडी’ सज्ज आहेत रोमानियामध्ये भीतीची नवी व्याख्या लिहिण्यासाठी!

अनेक वर्षांपासून रोमानियाचे परिकथेत वर्णिलेले किल्ले, नयनरम्य गावे आणि विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने साहसी प्रवाशांना मोहित केले आहे आणि त्यामुळे सुट्टीसाठीचे ते एक लोकप्रिय डेस्टिनेशन बनले आहे. पण या स्वप्नातल्या स्थानाची पटकथा आता भयानक धोक्याचे डेस्टिनेशन म्हणून नव्याने लिहिली जाणार आहे, जेथे भयावर विजय मिळवला जाईल आणि शौर्याच्या दंतकथांचे पडसाद उमटत राहतील .. कारण इस बार होंगी डर की नई कहानियां, इन रोमानिया! आत्तापर्यंत ज्या प्रांताने आपल्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली, त्या ठिकाणी आता करण्यात येतील हृदयाची धडधड वाढवणारे स्टंट आणि सामोरी येतील भेडसावणारी आव्हाने. एका दिल धडक रोलर कोस्टर राईडसाठी सज्ज व्हा, कारण, कलर्स घेऊन येत आहे खतरों के खिलाडी या स्टंट आधारित रियालिटी शोची 14 वी आवृत्ती. डेंजरटेन्मेंटचे विश्व साकार करत कलर्स ही वाहिनी प्रेक्षकांना आवाहन करत आहे. रोमानियाच्या आकर्षक पण भयंकर प्रांतात हिंमतीचे नवे अध्याय उलगडताना बघताना आपल्या सीटला घट्ट धरून ठेवा.

या शोच्या घोषणेबद्दल बोलताना जनरल एन्टरटेन्मेंट, व्हायकॉम18 चे अध्यक्ष आलोक जैन म्हणाले, “खतरों के खिलाडी या आमच्या  प्रारंभिक शोची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर अजून आहे. दर वर्षी या शोची आतुरतेने वाट पाहिली जाते. अमाप लोकप्रियता आणि यश यांच्यामुळे उत्साहाने सज्ज झालेल्या या शोच्या 14 व्या आवृत्तीत प्रथमच रोमानियाच्या नेत्रदीपक प्रांतात मनातील भीतीशी दोन हात करण्यास स्पर्धक तयार आहेत. आमची अग्रेसर राहण्याची वृत्ती आणि मूल्ये यांच्याशी मिळत्या जुळत्या ब्रॅंडशी भागीदारी करून पहिल्यांदाच हुंडईला आमचे प्रेझेंटिंग पार्टनर म्हणून सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. जाहिरातदारांसाठी आमच्या प्रेक्षकांशी जोडण्याचा एक मंच प्रदान करणारा हा शो त्याच्याशी निगडीत ब्रँड्ससाठी खळबळ उडवणाऱ्या आणि वेधक संधी उत्पन्न करेल. या शोसोबत 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या रोहित शेट्टीचे मी अभिनंदन करतो. या सर्व सत्रांत अॅक्शनमधले त्याचे नैपुण्य आणि त्याने केलेले मार्गदर्शन मूल्यवान होते.”

होस्ट रोहित शेट्टी म्हणतो, “दर वर्षी ‘खतरों के खिलाडी’चा होस्ट बनणे ही एक परंपरा बनली आहे, जी निभावताना मला खूप आनंद होतो. दर वर्षी मी स्टंटच्या नवीन पातळ्या आणि अॅक्शन याबाबत प्रयोग करत असतो. प्रत्येक सीझनमध्ये नावीन्य असते आणि आगामी सीझन पहिल्यांदाच रोमानियाच्या मोहक प्रांतात मुशाफिरी करणार आहे. या नवीन सीझनमध्ये हिंमतीची कसोटी होईल आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल. ‘खतरों के खिलाडी’च्या या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करण्यास आणि स्पर्धकांपुढे भेडसावणारे स्टंट प्रस्तुत करण्यास मी आतुर आहे.”

हुंडई मोटर इंडिया लि. चे COO तरुण गर्ग ‘खतरों के खिलाडी’ या भारतातील अत्यंत रोमांचकारी आणि लोकप्रिय कार्यक्रमाशी सहयोग करत असल्याचा उत्साह व्यक्त करत म्हणाले, “पहिल्यांदाच खतरों के खिलाडी शी हातमिळवणी करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हुंडई येथे आम्ही नेहमी एखाद्या अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाशी भागीदारी करण्यास उत्सुक असतो, ज्यातून जनमानसाची भावना व्यक्त होते. आम्हाला वाटते की, या भागीदारीमुळे समस्त देशातल्या आमच्या प्रेक्षकांशी आमचे नाते अधिक दृढ होईल आणि आम्ही त्यांना एक आनंददायक अनुभव देऊ. आमच्या या यशस्वी भागीदारीतून ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी सीझनची रंजकता, रोमांच आणखीन वाढेल. हुंडईचे इनोव्हेशन आणि ‘खतरों के खिलाडी’ची धाडसी वृत्ती यांच्या मीलनात सामील व्हा आणि त्यांच्यासोबत करा मनोरंजनाचा हा प्रवास. हा संबंध अधोरेखित करत आहे, हुंडई क्रेटा, जी निर्विवाद आहे आणि सर्व प्रभावशाली वस्तूंचे प्रतीक आहे.”

या सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून धाडसी वीर आले आहेत. हे स्पर्धक आहेत – अभिषेक कुमार, शालीन भानोट, अदिती शर्मा, गश्मीर महाजनी, करण वीर मेहरा, शिल्पा शिंदे, सुमोना चक्रवर्ती, निमृत कौर अहलुवालिया, असीम रियाज, कृष्णा श्रोफ, केदार आशीष मेहरोत्रा आणि नियती फतनानी. एंडेमॉल शाईन इंडिया द्वारा निर्मित, हुंडई सादर करत आहे ‘खतरों के खिलाडी 14’ स्पेशल स्टेटस इंडिका ईझी हेअर कलर आणि विक्स. लवकरच येत आहे कलर्सवर!

हुंडई प्रेझेंट्स ‘खतरों के खिलाडी 14’ स्पेशल स्टेटस ईझी हेअर कलर आणि विक्स, लवकरच सुरू होत आहे कलर्सवर!