आझम कॅम्पस च्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश

पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल, एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड  ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी  बारावीच्या  परिक्षेत घवघवीत यश मिळवले. 

आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज च्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३  टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल १०० टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ९८.५५ टक्के इतका लागला.व्होकेशनल शाखेचा निकाल ९५.५२ टक्के लागला. विज्ञान शाखेतून ८४.८३ टक्के गुण मिळवून सारा अयाझ मेमन  प्रथम आली . कला शाखेत  ९४.६७ गुण मिळवून झोया मतीन खान प्रथम आली तर कॉमर्स विभागात जसलीन कौर सतींदर सिंग पराशर ला  ९०.३३ टक्के गुण मिळाले आणि प्रथम आली . प्राचार्य  रोशन आरा शेख यांनी अभिनंदन केले.  

अँग्लो उर्दू बॉईज् स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९२.७९ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९७.८२ टक्के तर कला शाखेचा ५३.४४ टक्के निकाल लागला. मुख्याध्यापक राज मुजावर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.जामदार जिब्रान जावेद हा विद्यार्थी ९४.१७ टक्के गुण मिळवून विज्ञान  शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात पठाण मुसाब आरिफ हा विद्यार्थी  ७९ टक्के मिळवून प्रथम आला तर शेख हाफसा असगर ही विद्यार्थीनी ८०.३३ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.

एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल ९१. ८२ टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल  ९८. ७१  टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ७२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९७.५० टक्के इतका लागला. मेमन झारहान झाहीद  हा विद्यार्थी  ८०.३३ टक्के गुण मिळवून विज्ञान  शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात बांगी युसूफ काझी हा विद्यार्थी ८३.५० टक्के मिळवून प्रथम आला तर  शेख झोया झाकीर  टक्के गुण मिळवून ७५.५ कला शाखेत प्रथम आली. मुख्याध्यापक सौ. अस्फिया अन्सारी  यांनी अभिनंदन केले.