होंडातर्फे भारतात इलेक्ट्रिफिकेशन वाढवण्यासाठी बेंगळुरू येथे नवीन संशोधन आणि विकास केंद्र

बेंगळुरू, मे २०२४ – होंडा आर अँड डी (भारत) प्रायव्हेट लिमिटेड (एचआरआयडी) ही होंडा मोटर कं. लि.ची उपकंपनी आणि भारतात होंडासाठी मोटरसायकल व उर्जा उत्पादनांसाठी संशोधन व विकास केंद्र म्हणून कार्यरत असलेल्या कंपनीने आज बेंगळुरूकर्नाटक येथे नवे सोल्यूशन आर अँड डी सेंटर सुरू केल्याचे जाहीर केले.

होंडाने २०५० पर्यंत आपली सर्व उत्पादने आणि कॉर्पोरेट कामकाजामध्ये कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे जागतिक ध्येय ठेवले आहे. कंपनी आपली वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी उर्जा स्त्रोतांच्या बाबतीत कार्बन न्यूट्रल बनवण्यासाठी काम करत आहे. मोटरसायकल व्यवसायात होंडाने २०४० मध्ये आपल्या सर्व मोटरसायकल उत्पादनांमध्ये कार्बन न्युट्रलिटी आणण्याचे ठरवले आहे.

आर्थिक घडामोडी सुरू असलेल्या भारतात २०२१ मध्ये भारतीय सरकारने पर्यावरण बदलाविषयी संयुक्त राष्ट्रांची नियमावली (पक्षांची २६ वी परिषद म्हणून सीओपी२६) जाहीर केली. त्यानुसार भारत २०७० ग्रीनहाउसमधील वायू उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी काम करणार आहे.

अशा पर्यावरण बदलांअंतर्गत ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी कंपनीने इलेक्ट्रिफिकेशनच्या ट्रेंडला प्रतिसाद द्यायला हवा, तसेच प्रस्थापित नियमावलीच्या बाहेर नवीन मूल्यनिर्मिती करत अधिक आकर्षक उत्पादने व सेवा पुरवायला हवी असे होंडाला वाटते.

सोल्यूशन आर अँड डी सेंटरद्वारे इलेक्ट्रिक वाहन विकास क्षेत्रात आधुनिक वाहन तंत्रज्ञान वेगाने समाविष्ट केले जाईल. त्याचप्रमाणे सॉफ्टवेयर आणि संशोधन व विकास कंपन्यांच्या संकल्पना व तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘सह- नवनिर्मिती’वर काम केले जाईल. त्याशिवाय इकोसिस्टीमचा भौगोलिक दृष्टीकोनातून लाभ घेत बेंगळुरूमधील सोल्यूशन आर अँड डी सेंटर विविध कंपन्यांबरोबर नवीन संकल्पनांसाठी भागिदारी करेल. भागिदारीच्या मदतीने नव्या संकल्पना तयार करून सद्य व्यवसाय आणि उत्पादनांच्या पलीकडे जात, दीर्घकाळाचा विचार करून नवीन सेवा व व्यवसाय विकसित केले जातील.

त्याहीपुढे जात होंडा सक्रियपणे सामाजिक क्षेत्रात काम करेल, उदा. होंडाच्या ट्रिपल अ‍ॅक्शन टु झिरो या उपक्रमाद्वारे (कार्बन न्युट्रलिटी, हरित उर्जा, स्त्रोतांचे वितरण) उर्जेचा प्रभावी वापर केला जाईल तसेच ट्रॅफिक अपघातांना प्रतिबंध करत समाजातील ट्रॅफिकमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण शून्यावर आणले जाईल.

होंडा नाविन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची परंपरा यापुढेही जपली जाईल आणि ग्राहकांना वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा आनंद मिळवून दिला जाईल.